Pune News : पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा मार्फत कार्यान्वित म्हाळुंगे माण नगररचना योजना क्र.1 करिता राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाचे पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणाची नुकतीच पर्यावरण मंजुरी मिळाली आहे.
२५०.५० हेक्टर क्षेत्रावर नगररचना प्रस्तावित
म्हाळुंगे माण नगररचना योजना २५०.५० हेक्टर क्षेत्रावर प्रस्तावित असून या नगररचना योजनेला शासनाकडून प्राथमिक मंजुरी डिसेंबर २०१९ मध्येच मिळाली आहे. सध्या नदीच्या पूररेषेतील बदलामुळे प्रथम फेरबदलाची कार्यवाही सुरु आहे. प्रथम फेरबदलाची प्रारूप नगर रचना योजना ३० डिसेंबर २०२२ रोजीच्या अधिसूचनेनुसार महानगर आयुक्त यांनी मंजूर केली आहे. (Pune News) त्यावर सूचना हरकती मागवून लवाद यांनी सुनावण्या पूर्ण केल्या आहेत व लवकरच ही योजना शासनाच्या अंतिम मंजुरी साठी शासनाकडे सादर केली जाईल.
या नगर रचना योजनेच्या प्रकल्प आराखड्याचे विकसनासाठी शासनाच्या पर्यावरण विभागाची मान्यता आवश्यक होती. या साठी प्रधीकारणाचे वतीने पर्यावरण विभागाचे पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणासमोर सादरीकरण करण्यात आले. त्यास अनुसरून राज्य शासनाने पर्यावरण विषयक ना हरकत प्रदान केली आहे.
म्हाळुंगे माण नगर रचना योजनेत प्रस्तावित रस्त्याखालील जागा ताब्यात घेणेबाबत कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. या योजनेमध्ये एकूण सुमारे २५ किलोमीटर लांबीचे रस्ते प्रस्तावित आहेत. यामध्ये विद्युत उपकेंद्र, सांडपाणी प्रक्रिया संयंत्र, वाहनतळ, स्मशान व दफनभूमी,सांस्कृतिक समुदाय केंद्र, इत्यादी सोयी –सुविधा भूखंडा करिता १४.६९ हेक्टर जागा प्रस्तावित आहे.(Pune News) तसेच योजनेमध्ये बगीचा,खेळाचे मैदान,लहान मुलांचे मैदान,नदी संरक्षण क्षेत्र, ओपन स्पेस, हरित पट्टा इत्यादी भूखंडा करिता ३३.६७ हेक्टर जागा प्रस्तावित केलेली आहे.
नगररचना योजनेसाठी पुणे महानगरपालिकाच्या वारजे येथील जलशुद्धीकरण केंद्रातून शुद्ध पाणी पुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी पुणे महापालिकेसोबत संयुक्त कार्यवाही केली जाणार आहे. (Pune News) तसेच ३२ दशलक्ष लिटर (MLD) क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया संयंत्र (STP) विकसित करण्यात येणार आहे. नगररचना योजने मधून वाहणाऱ्या नाल्याचे सुशोभीकरण करण्याचे प्रस्तावित आहे.
दरम्यान, या प्रकल्पात पहिल्या टप्प्यात रस्त्यात येणारी १४१ झाडे तोडण्यात येणार असून ३५ झाडे स्थलांतरित करण्यात येणार आहे. (Pune News) तसेच संपूर्ण प्रकल्पात १३६३० नवीन झाडे लावण्यात येणार आहे. पर्यावरण परवानगी मिळाल्यामुळे नगररचना योजनेच्या विकासाच्या कामांना गती मिळाली आहे. सद्यस्थिती मध्ये ३ रस्त्यांची कामे आणि नाल्यावर ५ पुलांचे कामे सुरु आहेत.
“ म्हाळुंगे माण नगररचना योजनेस राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाने पर्यावरण विषयक परवानगी दिली असल्याने योजनेच्या विकास कामांना निश्चित गती मिळेल. “
– राहुल महिवाल (महानगर आयुक्त , PMRDA, पुणे)
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : गर्लफ्रेंडला इंप्रेस करण्यासाठी तब्बल १५ मोबाईल चोरले ; भिवरीतील दोघांना अटक
Pune News : पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात; दुचाकी तरुणाचा जागीच मृत्यू;