Pune News : पुणे : ससून रूग्णालयातून पसार झालेला ड्रग्ज तस्कर ललित पाटील याला पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या विनय अऱ्हानासह तिघांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी ३० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अभिषेक विलास बलकवडे (वय ३१), भूषण अनिल पाटील (वय ३४, दोघेही रा. नाशिक) आणि विनय विवेक अऱ्हाना (वय ५०) अशी पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ललित पाटील हा ससून रुग्णालयाच्या वाॅर्ड क्र १६ मध्ये उपचार घेत असताना भूषण पाटीलने २९ सप्टेंबर रोजी, तर अभिषेक बलकवडे याने ३० सप्टेंबर रोजी त्याची भेट घेतली होती. या दोघांनी कट रचून ललित पाटीलला पळविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
कट रचून ललित पाटीलला पळविल्याचे तपासात निष्पन्न
ससून रुग्णालयातून ललित पाटील फरार झाल्यानंतर बंडगार्डन पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांना ललित पाटीलला फरार होण्यास मदत केल्याच्या गुन्ह्यात वर्ग केले आहे. (Pune News ) याच दरम्यान सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कारवाई केलेल्या विनय अऱ्हाना याला बुधवारी तळोजा कारागृहामधून पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले होते. गुरुवारी तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. यापूर्वी दत्तात्रय डोके आणि अर्चना निकम यांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, ललित पाटील ससून रुग्णालयातून २ ऑक्टोबर रोजी पळून गेला. त्यावेळी अऱ्हाना याने त्याला पळून जाण्यासाठी मदत केली. (Pune News ) अऱ्हानाकडे काम करणारा चालक दत्तात्रय डोके याने ललितला गाडी मिळवून दिली. तत अऱ्हानाचा व्यवस्थापक अश्विन कामत याने त्याला एटीएम दिल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली आहे. विनय अऱ्हाना याने कोणाच्या सांगण्यावरून ललित पाटीलला मदत केली? पळून जाण्याचा कट कुठे रचला? याचा तपास करण्यासाठी सरकारी वकील नीलिमा यादव-इथापे यांनी सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती.
या प्रकरणी विनय अऱ्हाना यांच्या वतीने भाग्यश्री सोतूर यांनी बाजू मांडली. त्यांनी आरोपीच्या पोलीस कोठडीला विरोध केला. अऱ्हाना यांच्या बाजूने युक्तीवाद करताना वकील सोतूर यांनी सांगिले की, आरोपी न्यायालयीन कोठडीत असताना ते चालक आणि व्यवस्थापकाला ललित पाटीलची मदत करा असे कसे काय सांगू शकतात? ललित पाटील पळाल्यानंतरही अऱ्हाना चार दिवस ससून रुग्णालयात होते. (Pune News ) त्याचवेळी त्यांची चौकशी का केली नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तर भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांच्या वतीने संदीप बाली यांनी बाजू मांडली.
दरम्यान, नायालयाने दोन्ही बाजू ऐकून आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : ललित पाटीलला नाशिकमधील ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची मदत
Pune News : स्वारगेट परिसरात रिक्षा चालकांकडून तरुणाचा खून ; चारही रिक्षा चालकांना अटक..