केडगाव / संदीप टूले : नवरात्र व दसऱ्यासाठी झेंडूच्या फुलांचे अधिक महत्व असते. या दोन्ही सणांना घराघरात झेंडूच्या फुलांची सजावट केली जाते. या काळात झेंडूच्या फुलांना चांगली मागणी असते. यामुळे शेतकरी झेंडूची लागवड करुन चार पैसे मिळण्याची अपेक्षेने झेंडूची लागवड करत असतात. कारण दसऱ्याला झेंडू फुलांना चांगला भाव हा मिळतोच. परंतु यंदा दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर झेंडूच्या भावात नीच्चांकी घसरण झाली आणि शेतकऱ्याच्या ऐन सणासुदीच्या काळात डोळ्यात पाणी आले.
पुणे, मुंबई, सारख्या मोठ्या बाजारपेठेत झालेल्या घसरणीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. पुणे मार्केटमध्ये केवळ १० ते १५ रुपये झेंडूला भाव शेतकऱ्यांना मिळाला तर काही शेतकऱ्यांनी अक्षरशः फुले रस्त्यावर टाकून मोकळ्या हाताने माघारी आले. कारण या वर्षी झेंडू च्या फुलांची विक्रमी आवक झाली व त्याचा परिणाम बाजारभाव या वरती झाला. यामुळे शेतकरी वर्गासमोर सणाच्या पार्श्वभूमीवर संकट निर्माण झाले आहे.
बाजार भाव कमी होण्यास मागील कारणे :
झेंडू हे पीक जेमतेम ३ ते ४ महिन्याचे पीक असून, हे आंतरपीक म्हणून ही याची लागवड केली जाऊ शकते. तसेच याची ऐन पावसाळ्यात लागवड केली जाते. त्यामुळे कमी पाणी असणारे शेतकरी याकडे जास्त प्रमाणात वळू लागले आहेत. नवरात्र व दसरा यात झेंडूच्या फुलांना मिळणारा हमकास भाव यामुळे शेतकरी या पिकाकडे जास्त प्रमाणात वळल्यामुळे बाजारभाव पडण्याचे हे प्रमुख कारण मानले जात आहे.
मागील वर्षापासून रेडिमेड (प्लासिक) च्या फुलांची जास्त मागणी वाढली असून, हे एकदाच घेतले तर वर्ष ते दोन वर्ष हे टिकते. तसे झेंडू दोन ते तीन दिवसात खराब होतात. त्यामुळे लोकांचा कल हा झेंडूच्या फुलांऐवजी या रेडिमेड फुलांकडे वाढला आहे. ही फुले दिसायलाही सारखीच वाटतात. त्यामुळे यावर्षी मागणं ही घातली आणि बाजारभाव ही घटले.
यावर्षी तर झेंडूची फुले ही तोडायला सुधा परवडली नाही. कारण १० ते २० रुपये भाव मिळाला तर फुले बाजारात जाऊ तोपर्यंत किलो मागे १० ते १५ रुपये खर्च येतो. लागवडीपासून तर तोडणीपर्यंत खर्च वेगळाच. त्यामुळे यावर्षी झेंडूने डोळ्यात पाणी आणायचे काम केले.
– गणेश महारनवर, एकेरीवाडी