पुणे : राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने (NCPCR) सोमवारी मुंबई पोलिसांना शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याची विनंती केली.
आयोगाने सांगितले की, आदित्य ठाकरे यांनी आरे जंगल वाचवण्यासाठी त्यांच्या पक्षाच्या प्रचारात लहान मुलांचा वापर केल्याचा आरोप करणारी तक्रार प्राप्त झाली आहे.
देशातील सर्वोच्च बालहक्क संस्था एनसीपीसीआरने मुंबई पोलिसांना बजावलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी आरे बचाव आंदोलन आणि राजकीय मोहिमेसाठी शिवसेनेच्या युवा शाखा ‘युवा’चा वापर करून अल्पवयीन मुलांचा वापर केल्याची तक्रार त्यांच्याकडे आली आहे.
आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर एक लिंक देखील शेअर केली ज्यामध्ये मुले आरेतील एकर जमीन वाचविण्यासाठी निषेधाचे फलक घेतलेले दिसतात. दरम्यान राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने म्हटले आहे की, वरील बाबी लक्षात घेता, आयोग तुम्हाला आरोपींविरुद्ध FIR नोंदवून या प्रकरणाची त्वरित चौकशी करण्याची विनंती करतो.