Pune News : पुणे : येरवडा येथील पांडू लमाण वस्तीत एक धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. गर्भपात करून अवघ्या चार महिन्यांचे अर्भक प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळून फेकून देण्यात आले. बुधवारी (ता. ११) सकाळी ही घटना उघडकीस आली. अनैतिक संबंधातून किंवा मुलगी असल्याचे निदान झाल्याने अर्भक फेकून दिल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
येरवड्यात धक्कादायक प्रकार उघड
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पांडू लमाण वस्तीतील शंकर मंदिराच्या कट्ट्यासमोर बुधवारी सकाळी चार महिन्यांचे अर्भक मृत अवस्थेत प्लॅस्टिकच्या पिशवीत फेकलेले आढळून आले. (Pune News) याप्रकरणी पोलीस कर्मचारी आनंद मन्हाळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम आणि अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. (Pune News) अर्भकाची पाहणी करून ससून रुग्णालयात पाठविले. चार महिन्यांचे अर्भक जन्माला येण्यापूर्वी गर्भपात करून फेकून देण्यात आले होते.
दरम्यान, हे बालक अनैतिक संबंधातून किंवा अर्भक मुलगी असल्याचे निदान झाल्याने फेकून देण्यात आले असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. (Pune News) परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने तपास सुरू करण्यात आला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : हॅलो, मी जिओ कस्टमर केअरमधून बोलतोय… तरुणीला सायबर चोरट्यांचा ५ लाखांचा गंडा
Pune News : पुणे रेल्वे स्थानकावर सराईत मोबाईल चोराला ठोकल्या बेड्या