Pune News : पुणे : हॅलो, मी जिओ कस्टमर केअरमधून बोलतोय… एचडीएफसी बँकेला लिंक असलेला तुमचा मोबाईल क्रमांक आता बंद होणार आहे… तुम्ही अॅसिस्ट अॅप डाऊनलोड करा… असे सांगून पुण्यातील एका तरुणीला सायबर चोरट्यांनी तब्बल ५ लाख २० हजार रुपयांना गंडा घातला.
वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल
याप्रकरणी वानवडी येथे राहणाऱ्या २७ वर्षांच्या महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ८४७९८०८९९८ व ६३८०१०२०५७ या दोन क्रमांकाच्या मोबाइल धारकांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune News) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादींना फोन करुन जिओ कस्टमर केअर मधून बोलत असल्याची खोटी माहिती दिली. एचडीएफसी बँकेला लिंक असलेला मोबाईल क्रमांक बंद होणार असल्याचे सांगून, अॅसिस्ट अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले.
दरम्यान, फिर्यादींनी त्यांच्या मोबाईलमध्ये अॅप डाऊनलोड केले. सायबर गुन्हेगारांनी फिर्यादीचा मोबाईल रिचार्ज करण्याच्या बहाण्याने त्यांच्या खात्यावर ८ लाख रुपये कर्ज घेतले. (Pune News) त्यानंतर कर्जाच्या रकमेतील ५ लाख २० हजार रुपये स्वत:च्या बँक खात्यात ट्रान्सफर करुन फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली. वानवडी भागात १८ ते १९ ऑगस्ट दरम्यान हा प्रकार घडला.
या घटनेचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुणे रेल्वे स्थानकावर सराईत मोबाईल चोराला ठोकल्या बेड्या
Pune News : वाघोली येथील जीएच रायसोनी कॉलेजमध्ये मानसिक ‘आरोग्य सप्ताह’ साजरा