मुंबई : ड्रग्ज माफिया ललित पाटील याला ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी राज्याचे मंत्री दादा भुसे यांचा फोन गेला होता, त्यांचे कॉल रेकॉर्डचा तपस करा, असा मोठा आरोप उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला. त्यापूर्वी पुण्यातील काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांनीही ललित पाटीलच्या पळण्यामागे शिंदे सरकारमधील मंत्र्याचा हात असल्याचा आरोप केला होता. ललित पाटीलने काही दिवसांपूर्वी ससूनमधून पलायन केले. त्यावरून सध्या जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
यावेळी बोलताना अंधारे म्हणाल्या की, ससून हॉस्पिटलचे प्रशासन ललित पाटील याला दाखल करून घेण्यास तयार नव्हते. त्यावेळी ससूनच्या प्रशासनाला राज्यातील मंत्र्यांचा फोन गेला. त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तसेच ललित पाटील आणि दादा भुसे हे नाशिकचे आहेत असं देखील त्या म्हणाल्या. याप्रकरणी राज्याच्या गृहमंत्र्यांनी दादा भुसे यांच्या कॉल रेकार्डसह इतर गोष्टींची सखोल चौकशी करावी.
आमदार रवींद्र धंगेकरांचा आरोप
माफिया ललित पाटीलला पळून जाण्यास मदत करण्यात शिंदे गटातील एका मंत्र्याचा हात असल्याचा आरोप कॉंग्रेस पक्षाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला होता. धंगेकर यांनी मंगळवारी ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांची भेट घेऊन ललित पाटील याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची माहिती मागितली. मात्र त्यांनी ही माहिती देण्यास नकार दिल्याने आमदार धंगेकर यांनी अधिष्ठातांच्या केबिनमध्येच ठिय्या मांडला. त्यांनी न दिल्याने आमदार रवींद्र धंगेकर यांनी ससूनच्या कारभाराबाबत चांगलेच सुनावले. तसेच माफिया ललित पाटीलवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील त्यांनी केली.
पुण्यातील शहरातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी मंगळवारी ड्रग्स माफिया ललित पाटील पळून जाण्यात एकनाथ शिंदे गटातील एका मंत्र्याचा हात असल्याचा आरोप होता. यावेळी त्यांनी कोणत्याही मंत्र्याचं नाव घेतलं नव्हतं. पण उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांचं नाव घेतल्याने याप्रकरणाला नवं वळण लागलं आहे.
हेही वाचा:
इंग्रजांची चाकरी केली म्हणूनच यशोमती ठाकूर यांच्या कुटुंबाला ठाकुरांची पदवी : खासदार अनिल बोंडे
आप नेत्यांवर ईडीची कारवाई सुरूच, जवळच्या व्यक्तींच्या डायरीवरून अमानतुल्ला खान रडारवर