Health News : निरोगी राहण्यासाठी सर्वांनीच दररोज पुरेशी झोप घेतली पाहिजे. सुदृढ आरोग्याचा झोपेशी थेट संबंध असतो. त्यामुळे झोपेचे तासच नव्हे तर तुम्ही कशी झोप घेता, हेदेखील आवश्यक असते. म्हणूनच अनेकांना काही तास पुरेशी झोप घेऊनही आराम वाटत नाही.
शरीराला पुरेशी झोप आवश्यक असते. पण वयानुसार झोप घेण्याचा काळही वेगवेगळा असतो. त्यामुळे याची माहिती असणेही गरजेचे आहे. 0 ते 3 महिने वयाच्या नवजात बालकांना 24 तासांत 14 ते 17 तासांची झोप लागते. 4 ते 12 महिने वयोगटातील मुलांना 12 ते 16 तासांची झोप आवश्यक असते. त्यात जसजसे मूल वाढत जाते तसतसे तास कमी होतात. 1 ते 2 वर्षे वयोगटातील मुलांना 11 ते 14 तासांची झोप आवश्यक असते.
तसेच 3 ते 5 वर्षांच्या मुलांसाठी दररोज 10 ते 13 तासांची झोप पुरेशी मानली जाते. तर 9 ते 12 वर्षांच्या मुलांनी दररोज 9 ते 12 तास झोपलेच पाहिजे, असाही सल्ला दिला जातो. याशिवाय 13 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन आणि तरुणांनी 24 तासांत 8 ते 10 तास चांगली झोप घेतली पाहिजे.
18 ते 60 वयोगटातील लोकांना 7 तासांची झोप पुरेशी
18 ते 60 वर्षे वयोगटातील लोकांसाठी दररोज 7 तासांची चांगली झोप पुरेशी मानली जाते. तर 61 ते 64 वर्षे वयोगटातील लोकांसाठी दररोज 7 ते 9 तास झोपणे आवश्यक आहे. 65 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या वृद्धांनी किमान 7 ते 8 तास झोपावे, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जातो.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Health News : हाता-पायांना सारख्या मुंग्या येतात? जाणून घ्या नेमकी काय घ्यावी काळजी..
Health Tips : रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची कशी? जाणून घ्या ; घरगुती उपाय..
Health News : डेंग्यूची चिंता सतावतीये? तर जाणून घ्या त्यावरील उपाय अन् घ्यावयाची काळजी..