शेरखान शेख
रांजणगाव गणपती (पुणे) : विठ्ठलवाडी (ता. शिरूर) येथील श्री पांडुरंग विद्यामंदिर विद्यालयाचे मुख्याध्यापक भाऊसाहेब वाघ यांना नुकतेच महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा जिल्हा गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
विठ्ठलवाडी (ता. शिरूर) येथील श्री पांडुरंग विद्यामंदिर विद्यालयाचे मुख्याध्यापक भाऊसाहेब वाघ यांनी विद्यार्थी हिताला प्राधान्य देत शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विद्यालयामध्ये सहकाऱ्यांच्या मदतीने अनेक उपक्रम राबवले. इंग्रजी विषयाच्या अध्यापना सोबत क्रीडा क्षेत्रामध्ये शाळेचा नावलौकिक वाढवला आहे. मुख्याध्यापक भाऊसाहेब वाघ यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत, कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते त्यांना सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी संघटन मंत्री गुलाबराव गवळे, जिल्हाध्यक्ष निलेश काशीद, जुन्नर तालुका शिक्षक परिषदेचे अध्यक्ष कैलास करपे, उपसरपंच विजय कुऱ्हाडे, उज्वला शेवाळे, पुणे जिल्हा क्रीडा संघटनेचे अध्यक्ष गणेश राऊत, शिरूर तालुका माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तुकाराम बेनके, सचिव मारुती कदम, शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल गवारी, कलाशिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष प्रवीणकुमार जगताप, मोहन ओमासे, अशोक दहिफळे, रवींद्र सातपुते, प्रा. संदीप गवारे यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, मुख्याध्यापक भाऊसाहेब यांना मिळालेल्या जिल्हा गुणवंत पुरस्काराबद्दल शिरूर तालुक्यातील विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.