लोणी काळभोर : थेऊरफाटा, कुंजीरवाडी (ता. हवेली ) येथील श्रीनाथ पतसंस्थेला सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात १.२५ कोटी रुपये निव्वळ नफा होऊन संस्थेच्या सभासंदाना १२ टक्के लाभांश देण्यात येणार आहे अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप धुमाळ यांनी दिली.
पुणे व ठाणे जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या श्रीनाथ पतसंस्थेची २२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पतसंस्थेच्या थेऊरफाटा येथील मुख्य कार्यालयात रविवारी (ता. .०४) पर पडली. यावेळी अध्यक्ष या नात्याने बोलताना संदीप धुमाळ यांनी लाभांश जाहीर केला.
यावेळी माजी सरपंच सुनिता धुमाळ, माजी सरपंच सचिन तुपे, जेष्ठ संचालक महादेव धुमाळ आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना संदीप धुमाळ म्हणाले कि, कोविडमुळे आर्थिक क्षेत्राचे खुप मोठे नुकसान झाले आहे. जास्त करून बँक आणि सहकारी संस्था यांना खूप मोठा फटका बसला आहे. तरी सुद्धा आपल्या संस्थेने भरीव कामगिरी करून सभासदांना लाभांश १२ टक्के लाभांश वाटप करणार आहे.
पतसंस्थेला २०२१-२०२२ वर्षात १.२५ कोटी रुपयाचा निव्वळ नफा झाला आहे. तर पतसंस्थेच्या ३१ मार्च २०२२ अखेर ३२ कोटी ८० लाख रुपयांच्या ठेवी, २५ कोटी ३१ लाख रुपयाचे कर्ज वाटप , तसेच गुंतवणूक १७ कोटी ७२ लाख रुपयाची केली आहे. संस्थेचे एकूण खेळते भांडवल ४७ कोटी ८२ लाख असून संस्थेची वसुली ९२. ४२ टक्के असून एनपीए ० टक्के आहे. अशी माहितीही धुमाळ यांनी दिली आहे.
दरम्यान, संस्थेच्या सभासदांच्या इयत्ता १० वी व १२ वी मधील गुणवंत मुलांचा गौरव करण्यात आला. नायगावच्या सरपंचपदी विराजमान झालेले नवनियुक्त सरपंच जितेंद्र चौधरी यांचा सत्कार करण्यात आला.
कुंजीरवाडी येथील श्रीराम वि.का.सोसा.अध्यक्षपदी दादासाहेब धुमाळ व उपाध्यक्षपदी संदीप गोपीचंद धुमाळ यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला आहे.
यावेळी संस्थेचे संचालक ज्ञानेश्वर धुमाळ, दत्तात्रय कुंजीर, संभाजी आंबेकर,अजय कुंजीर, राहुल धुमाळ, दीपक खटाटे, गोकुळ ताम्हणे, पतसंस्थेचे मुख्य व्यवस्थापक शिवाजी जावळे, परिस फाऊंडेशनच्या वैशाली मेमाणे व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. या सभेचे अहवाल वाचन व सूत्र संचालन संस्थेचे कार्यकारी संचालक ज्ञानेश्वर धुमाळ यांनी केले आहे.