India Gold Medal Asian Games 2023 : एशियन गेम्स 2023 स्पर्धा ही चीनमधील हांगझो येथे सुरु आहे. या स्पर्धेच्या आठव्या दिवशी भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. नेमबाजीमध्ये टीम इंडियाला सुवर्ण पदकासोबत रौप्य पदकही मिळाले. भारतीय नेमबाज चेनाई, पृथ्वीराज टोंडिमन आणि जोरावर सिंग यांनी चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले. महिला संघाने रौप्यपदक पटकावले. भारताला गोल्फमध्येही रौप्यपदक मिळाले आहे.
???? Gold Rush Alert! ???? #AsianGames2022
???????? Shooters @tondaimanpr, #KheloIndiaAthlete @KynanChenai, and Zoravar Singh Sandhu have shot their way to GOLD in the Men’s Trap Team event! ???????????? with an Asian Games record of 361 ⚡
Their precision, focus, and teamwork have brought glory… pic.twitter.com/7pAakYlsaj
— SAI Media (@Media_SAI) October 1, 2023
आतापर्यंत नेमबाजीत भारताने 7 वे सुवर्ण जिंकले आहेत. चेनाई, पृथ्वीराज टोंडिमन आणि जोराव या त्रिकुटाने पुरुषांच्या सांघिक ट्रॅप नेमबाजीत चमकदार कामगिरी केली. भारतीय नेमबाजांनी चमकदार कामगिरी करत सुवर्ण जिंकले. महिला संघानेही अप्रतिम कामगिरी केली आहे. राजेश्वरी कुमारी, मनीषा कीर आणि प्रीती रजक यांनी महिला सांघिक ट्रॅप नेमबाजीत रौप्यपदक पटकावले आहे. या स्पर्धेत आतापर्यंत भारताने एकूण 41 पदके जिंकली आहेत. त्यामध्ये 11 सुवर्ण पदकांचा समावेश आहे.
यापूर्वी नेमबाजीत ऐश्वर्या तोमर, रुद्रांक्ष पाटील आणि दिव्यांश पनवार यांनी १० मीटर एअर रायफल सांघिक स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक जिंकले होते. मनू भाकर, ईशा सिंग, रिदम संगवान यांनी २५ मीटर पिस्तूल सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. सिफ्ट कौर समरा हिने महिलांच्या ५० मीटर रायफल ३ पोझिशनमध्ये सुवर्णपदक जिंकले. अर्जुन चीमा, सरबज्योत सिंग आणि शिव नरवाल यांनीही नेमबाजीत सुवर्णपदक पटकावले. या त्रिकुटाने पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये चमकदार कामगिरी केली.
एशियन गेम्स स्पर्धेचा आठव्या दिवसाची सुरुवात भारतासाठी चांगली झाली आहे. भारताने आज आतापर्यंत तीन पदके जिंकली आहेत. आदिती अशोकने पहिले पदक जिंकले. गोल्फपटू अदितीकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा होती. पण तिला फक्त रौप्य पदक जिंकता आले. यानंतर नेमबाजीत महिला संघाने रौप्य आणि पुरुष संघाने नेमबाजीत सुवर्णपदक पटकावले.