Pachgani News : पाचगणी : सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी विविध गुन्हे दाखल असलेल्या गावगुंडाला तालुका बंदीचा आदेश तहसीलदारांनी काढल्याची माहिती पाचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांनी दिली. विसर्जन मिरवणुकीत पोलीस प्रशासनाने डॉल्बीवर देखील बंदी घातली आहे.
डॉल्बीवर देखील बंदी
पाचगणी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी अनंत चतुर्थीच्या दिवशी विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीचा वापर न करता पारंपरिक वाद्यांचा वापर करावा. (Pachgani News ) विसर्जन मिरवणूक वेळेत सुरू करून, वेळेत संपवावी. डॉल्बीचा वापर करताना कोणी आढळल्यास, डॉल्बीचे साहित्य जप्त करून डॉल्बी मालकावर प्रचलित कायद्यानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांनी दिली.
गोडवली येथील भरत ऊर्फ बाळू तुकाराम मालुसरे याच्यावर पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याने, पाचगणी हद्दीतील गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी महाबळेश्वर तालुका हद्दीत प्रवेश करण्यास महाबळेश्वर तहसिलदारांनी मनाई केली आहे. (Pachgani News ) याबाबतचा प्रस्ताव पाचगणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश माने यांनी तहसिलदार महाबळेश्वर यांच्याकडे पाठविला होता.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pachgani News : पाचगणी शहर व परिसरातील पाच दिवसांच्या गणपतीला भक्तिमय वातावरणात निरोप