Pune News : पुणे : पुणे जिल्ह्यात सासवड-जेजुरी पालखी महामार्गावर खळद बोरावके मळा येथे सोमवारी रात्री पालखी मार्गावर भीषण अपघात झाला. अंधारात रिक्षा प्रवाशांसह विहिरीत पडल्याची दूर्दैवी घटना घडली. या अपघातात तिघांना प्राण गमवावे लागले. मृतांमध्ये दोन दिवसांपूर्वी विवाह झालेल्या एका नवविवाहित दाम्पत्याचा समावेश आहे. अपघातातील जखमींना सासवडच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
खळद, बोरावके मळा येथे घडला अपघात
सासवड-जेजुरी पालखी महामार्गावर खळद बोरावके मळा येथे सोमवारी रात्रीच्या वेळेस हा अपघात झाला. या मार्गावरुन जाणारी रिक्षा (क्र. एमएच १२ क्यूई ७७०६) विहिरीत पडली. या रिक्षामधून दोन दिवसांपूर्वी विवाह झालेल्या एका दाम्पत्यासह तिघेजण प्रवास करत होते. विहिरीत पडलेल्या दोघांना रेस्क्यू टीमने सकाळीच बाहेर काढले. तर तीन जण विहिरीत अडकले होते. (Pune News) त्यांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू टीमने पुन्हा बचावकार्य सुरु केले. मंगळवारी सकाळी ११ वाजेपर्यंत तिघांना बाहेर काढण्यात आले. या तिघांचा मृत्यू झाला. त्यामध्ये एक पुरुष आणि २ महिलांचा समावेश आहे. मृतांची ओळख पटली असून, शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. मृत व्यक्ती एकाच कुटुंबातील आहेत.
दरम्यान, या भीषण अपघातात दोन दिवसांपूर्वी विवाह झालेल्या नवविवाहित दाम्पत्याचा संसार सुरू होण्यापर्वीच अंत झाला. रोहित विलास शेलार (वय २३), वैष्णवी रोहित शेलार (वय १८ ) या नवविवाहीत जोडप्याचा दूर्दैवी मृत्यू झाला. लग्नानंतर नवदाम्पत्य देवदर्शनाला जेजुरीला जात होते. (Pune News) श्रावणी संदीप शेलार (वय १७) या मुलीला देखील अपघातात आपले प्राण गमवावे लागले. तर आदित्य मधुकर घोलप (वय २२), शितल संदीप शेलार (वय ३५) हे जखमी झाले आहेत.
सर्व जण पुणे शहरातील रहिवाशी आहेत. भोर उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे, सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव आणि रेस्क्यू टीमकडून यासाठी प्रयत्न केले. (Pune News) या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
महामार्गावरील अपघातांचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी आता पुणे शहर आणि जिल्ह्यात ब्लॅक स्पॉट शोधण्यात आले आहेत. (Pune News) अपघात रोखण्यासाठी याठिकाणी उपाययोजना करण्यात येणार आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : राज्यात जोरदार पाऊस पडू दे… अजित पवार यांची कसबा गणपतीसमोर प्रार्थना