Pune News : पुणे : मुंबई-बंगळुरू महामार्गावर नऱ्हे येथील नवले ब्रीजजवळ अनेकदा अपघात होतात. अपघात रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून येथे वेग दर्शवणारे कॅमेरे तसेच स्पीडगन बसविण्यात आल्या होत्या. चोरट्यांनी या स्पीडगनचीच चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चोरीला गेलेल्या साहित्याची किंमत २ लाख रुपये आहे. या प्रकरणी विशाल विष्णू वायकर यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
चोरी झाल्याची फिर्याद वायकर (वय २७, रा. शाहूनगर, चिंचवड) यांनी दिली. वायकर हे “सेव्ह लाईफ फाऊंडेशन” या चिंचवडमधील एनजीओमध्ये सीनिअर असोसिएट क्रॅश इनव्हेस्टीगेशन ॲन्ड प्रिव्हेंन्शन या पदावर कार्य करतात. महामार्गावरील वाढते अपघात कशा पद्धतीने टाळता येतील, (Pune News) त्यावर उपाय योजण्यासाठी ते अनेक उपाययोजना सुचवत असतात. याचाच एक भाग म्हणून सेव्ह लाईफ फाऊंडेशनने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी (एनएचएआय) पत्रव्यवहार केला. त्याद्वारे महामार्गावर भूमकर चौकाच्या पुढे सेल्फी पॉईंटजवळ स्पीड गन आणि व्हेईकल ॲक्चुएटेड स्पीड साईन हे उपकरण बसविण्याचा प्रस्ताव दिला होता.
प्राधिकरणाने हा प्रस्ताव मंजूर केल्यावर १३ मार्च २०२३ रोजी अँडॉर कंपनीची स्पीड गन आणि उपकरण महामार्गावरील दुभाजकावर भूमकर सेल्फी पॉईंटजवळ बसविले होते. (Pune News) हे उपकरण मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना ‘सावकाश जा’ असा संदेश दाखवत होते. जाणाऱ्या वाहनाचा वेगही त्यावर नोंदवला जात होता.
फिर्यादी हे स्पीडगन आणि उपकरणाची देखरेख आणि दुरुस्ती पाहात होते. दरम्यान, शुक्रवारी (ता. २२) तपासणीत स्पीडगन आणि उपकरण जागेवर नसल्याचे आढळले. (Pune News) त्यामुळे वायकर यांनी स्पीडगन चोरीस गेल्याची तक्रार दिली. याप्रकरणी तपास सुरू असल्याचे तपास अधिकारी पोलीस अंमलदार भोसले यांनी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune news : ‘पोरी तुझा पाहून गं टॅटू’… गाण्याची गणेशोत्सवात धूम
Pune News : नाणेघाटात पर्यटनासाठी आलेल्या बडोद्यातील पर्यटकाचा पाण्यात बुडून मृत्यू
Pune news : कमी पटसंख्येच्या शाळांचे रुपांतर आता ‘समूह शाळेत’ होणार