लोणी काळभोर, (पुणे) : थेऊरफाटा, कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील श्रीनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या सभासदांना १४ टक्के लाभांश देण्यात आला आहे. पतसंस्थेची २३ वि वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. यावेळी सभासदांना १४ टक्के लाभांश देण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष संदीप धुमाळ यांनी दिली.
संस्थेचे अध्यक्ष संदीप धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली हि सभा आयोजीत करण्यात आलेली होती. या सभेला सभासदांनी उत्स्फूर्तपणे उपस्थिती लावली होती. यावेळी वरील माहिती धुमाळ यांनी दिली.
यावेळी संस्थेचे संचालक सचिन तुपे, संभाजी आंबेकर, महादेव धुमाळ, दीपक खटाटे, अजय कुंजीर, राहुल धुमाळ, दत्तात्रय कुंजीर, उमेश राखपसरे, खंडू गडदे, सुनीता धुमाळ, वैशाली मेमाने तसेच संस्थेचे व्यवस्थापक शिवाजी जावळे उपस्थित होते.
यापुढे बोलताना संदीप धुमाळ म्हणाले कि, संस्थेच्या २०२२- २३ या वर्षाच्या अखेर ३४ कोटी ४६ लाख ठेवी, २४ कोटी २३ लाख कर्ज, २२ कोटी २३ लाख गुंतवणूक, ४९ कोटी ७९ लाख खेळते भाग भांडवल, संस्थेस निव्वळ नफा १ कोटी ३० लाख एवढा झाला असून पतसंस्थेकडून सभासदांना १४ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला आहे.
त्याचबरोबर संस्थेने दैनंदिन व्यवहारात आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत आजच्या सभेच्या दिवशी श्रीनाथ मोबाईल बँकिंगअँपचा शुभारंभ धुमाळ यांनी केला. या ॲपमुळे संस्थेचे दैनंदिन व्यवहार घरच्या घरी सभासदांना मोबाईल द्वारे करता येतील. व इंटरनेटच्या जगात ही सुविधा खूप महत्त्वाची आहे अशी माहिती दिली.
दरम्यान, पंचक्रोशीतील गुणवंत विद्यार्थी आणि विशेष कर्तुत्वान व्यक्तींचा सन्मान यावेळी करण्यात आला. यामध्ये जगातील सर्वोच्च शिखर एवरेस्ट सर करणारे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणारे सेल्स टॅक्स ऑफिसर म्हणून रुजू झालेले निखिल लांडगे, लंडन युनिव्हर्सिटी येथे फर्स्ट क्लास एमबीए करणारे संग्राम धुमाळ, प्रणित धुमाळ, अथर्व कुंभारकर, बोरकर अशा विविध क्षेत्रात नावलौकिक मिळालेल्या सभासद व सभासद पाल्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी अहवालाचे वाचन व सूत्रसंचालन संस्थेचे कार्यकारी संचालक श्री ज्ञानेश्वर धुमाळ यांनी केले.