Mumbai News : मुंबई : लावणी नृत्यांगना गौतमी पाटील नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. गौतमीचा चाहतावर्ग मोठा आहे. अनेक समारंभांना गौतमीचे लावणी कार्यक्रम आयोजित केले जातात. गौतमीच्या कार्यक्रमांना तुफान गर्दीही झालेली पाहायला मिळते. गौतम पाटील तिच्या नृत्याबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.
अनेकदा तिच्या नृत्य सादरीकरणामुळे तिच्यावर टीका केली जाते. मात्र, गौतमीची लोकप्रियता अजूनही कायम आहे. लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या गौतमीला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक आहेत. सध्या गौतमी पाटील एका वेगळ्याच गोष्टीसाठी चर्चा आहे. गौतमीला नवरा कसा हवाय? तिच्या मनातील जोडीदार कसा आहे? याचीच सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. शिवाय खुद्द गौतमीनेच या चर्चांना पुष्टी दिल्याने ही चर्चा सुरू झाली आहे.
गौतमीच्या जोडीदाराविषयी जोरदार चर्चा सुरू
नवरा कसा पाहिजे, नवऱ्याकडून काय अपेक्षा आहेत, या प्रश्नाचे उत्तर देताना एका मुलाखतीत गौतमी म्हणाली की, माझे आयुष्य सर्वांना माहीत आहे. माझी वाटचाल संघर्षमय आहे. (Mumbai News) माझा प्रवास मला ओळखणाऱ्या सर्वांनाच माहिती आहे. मला गुण-दोषांसह स्वीकारणारा नवरा पाहिजे. मी जे भोगले आहे, ते स्वीकारणारा असला पाहिजे. नशिबाने असा नवरा मिळाला तर उत्तम.
घरच्यांविषयी बोलताना गौतमी म्हणाली की, घरचे सर्वजण लग्नासाठी तगादा लावत आहेत. मी तिकडे लक्ष देत नाही. मात्र, मी लग्न करणार आहे, असे तिने स्पष्टच सांगितले आहे. (Mumbai News) लवकर लग्न करण्याचा माझा विचार नाही. मात्र, जेव्हा लग्नाचा विचार डोक्यात येईल आणि आई म्हणेल तेव्हा मी लग्न करणार आहे. लग्न कधी करते म्हणून माझ्या घरचे माझ्या मागे लागतात. मी त्याकडे लक्ष देत नाही. माझ्या मनात तो विषय नाही. मी अरेंज मॅरेज करणार आहे, असे गौतमी पाटील म्हणाली.
माझा जोडीदार ही केवळ माझी पसंती नसेल. माझ्या आईने पसंत केलेल्या मुलाशीच मी विवाह करणार आहे. माझ्याशिवाय माझ्या आईला आणि तिच्याशिवाय मला कुणीही नाही. (Mumbai News) त्यामुळे माझा जोडीदार तिलाही सांभाळणारा असावा, असेही गौतमीने सांगितले. कार्यक्रमात बुके मिळाला किंवा ट्रॉफी मिळाली तर मी रात्री उशिरा घरी गेल्यावरही आईला उठवून दाखवते. आईला पुरस्कार पाहून आनंद होतो.
माझ्यावर २५ जणांच्या टीमची जबाबदारी आहे. मला या जबाबदारीचे भान आहे. या सर्वांचा विचार करूनच आम्ही बिदागी घेतो. पण लोक आमच्या बिदागीबद्दल काहीही अफवा पसरवत आहेत. (Mumbai News) आम्ही खोटे बोलतोय असे वाटत असेल तर ज्यांनी आमचे कार्यक्रम घेतले त्यांना विचारा, असेही ती म्हणाली.