हनुमंत चिकणे
लोणी काळभोर (पुणे) : लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील महात्मा फुले नगर परिसरातील जी.एम. ग्रुपचा गणपती हा परिसरातील नागरिकांचे प्रमुख श्रद्धास्थान आहे. सामजिक कार्य करणाऱ्या काही मंडळापैकी जी.एम ग्रुपचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंडळाचा उल्लेख महत्त्वाचा ठरतो आहे. केवळ गणेशोत्सवच नव्हे तर वर्षभर विविध सामाजिक काम करताना सर्वस्पर्शी उपक्रम राबविण्याची हातोटी या मंडळाने साध्य केली आहे.
या मंडळाचे मार्गदर्शक व आधारस्तंभ म्हणून शिवाजी जावळे गेल्या पंधरा वर्षापासून काम आहेत. तसेच अध्यक्ष महेश गायकवाड व उपाध्यक्ष अजित जगताप यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने संघटन करताना मंडळाची सर्वसमावेशकता जपली आहे. समाजोपयोगी बरोबरच धार्मिक दृष्टिकोनातून गणेशोत्सव साजरा करण्यासाठी काही लोक पुढे आले. १५ वर्षापूर्वी या मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.
लोकवस्ती विरळ असताना त्या परिसरात राहणाऱ्या लोकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाला वेगळे स्वरूप प्राप्त झाले. त्यांचा विश्वास, प्रेम, आपुलकी आणि सहकाराच्या बळावर मागील १५ वर्षापेक्षा जास्त काळ मंडळ येथे कार्यरत राहिले. त्यातून समता, बंधुता, राष्ट्रीयत्व वाढीस लागले आहे. ‘शिवसृष्टी’, ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’, ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’, पूरग्रस्त, शेतकरी आत्महत्या, भारतरत्न, देशातील शास्त्रज्ञ, तसेच पुण्यात पहिल्यांदा पर्यावरण वाचवा हा संदेश देणारा मूर्तिदान व निर्माल्यदान ही संकल्पना १५ वर्षांपूर्वी राबवणारे पहिले मंडळ आहे.
चालूवर्षी भारत देश अंतराळातील महासत्ता चंद्रयान-३ या यशस्वी मोहिमेमुळे झाला आहे. यावर्षीची जीएम ग्रुपने
चांद्रयान -३ ची प्रतिकृती करून त्याबाबतची माहिती दिली आहे. तसेच चांद्रयान मोहिमेसाठी शास्त्रज्ञांचे मोलाचे योगदान लाभले. त्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच इस्त्रो प्रमुख एस. सोमनाथ व त्यांची टीम याबाबत माहिती देण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभाग विभागाकडून याबाबत गौरविण्यात आले आहे. मंडळाची मिरवणूक गुलाल विरहित दरवर्षी ढोल ताशाच्या गजरात होते. मंडळास विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मंडळींनी भेट देऊन या विविध उपक्रमाबाबत प्रशंसा केली जात आहे.
दरम्यान, मंडळाचे मार्गदर्शक व आधारस्तंभ शिवाजी जावळे, अध्यक्ष महेश गायकवाड व उपाध्यक्ष अजित जगताप, पदाधिकारी मयूर भुजबळ, सचिन गायकवाड, अमोल गायकवाड, संदीप फुले, संतोष भुजबळ, रणजीत जगताप, सागर भुजबळ, गजानन सानप, ब्रह्मा गायकवाड, रोहित गायकवाड, राजेंद्र हिंगणे इत्यादी काम पाहत आहेत.