पुणे : सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल फोन, स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आवश्यक तेवढा मोबाईल वापरल्यास जास्त तोटा नाही. मात्र, सातत्याने मोबाईलचा वापर केल्यास ते आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे वेळीच याचा अतिरिक्त वापर टाळावा, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
मोबाईल फोनमधून रेडिएशन बाहेर पडतात. त्याचा शरीरावर विघातक परिणाम होत असतो. मोबाईल फोनची बॅटरी कमी असताना सर्वाधिक रेडिएशन होत असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मोबाईल फोनची बॅटरी चार्ज केलेली असावी, असाही सल्ला दिला जातो. मोबाईल फोनच्या रेडिएशनपासून संरक्षण करण्यासाठी कमीत कमी वेळ मोबाईल फोनवर बोलावे, असेही सांगितले जात आहे.
मोबाईल फोनच्या माध्यमातून रेडिएशन येतात आणि मोठ्या प्रमाणातील रेडिएशनमुळे शरीरास धोका निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे मोबाईलचा अतिरिक्त वापर न करण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जात आहे. तसेच मोबाईलमधील रेडिएशनमुळे कर्करोगाचा धोका वाढत असल्याचेही ‘डब्ल्यूएचओ’ अर्थात जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे. त्यामुळे आवश्यक तेवढाच मोबाईलचा वापर करावा.