Pune News : पुणे : लोणीकंदमधील हॉटेल मनोरा येथे २० वर्षांच्या बांग्लादेशी तरुणीसह हिंजवडी, कोलकत्ता येथील ६ तरुणींकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात होता. तरुणींना पैशांचे आमिष दाखवून राजरोसपणे हा व्यवसाय सुरू होता. या घटनेची माहिती मिळताच, सामाजिक सुरक्षा विभागाने तत्काळ छापा टाकून तेथून सहा तरुणींची सुटका केली असून, दोन मॅनेजरना अटक केली आहे.
दोन मॅनेजरना अटक
याबाबत पेलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, प्रज्योत हिरीआण्णा हेगडे (वय २७, रा. पेरणे फाटा) आणि गिरीश शाम शेट्टी (वय २९, रा. पेरणे फाटा) अशी अटक केलेल्या मॅनेजरची नावे आहेत. (Pune News) याबाबत सामाजिक सुरक्षा विभागातील रेश्मा कंक यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, फ्रिडम फर्मच्या सदस्यांना हॉटेल मनोरा येथे वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाने तेथे बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. त्यानंतर छापा टाकण्यात आला. मॅनेजर ग्राहकाकडून दीड हजार रुपये घेत असत.(Pune News) त्यातील एक हजार रुपये दोघे वाटून घेऊन तरुणींना पाचशे रुपये देत असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांना दोन मॅनेजरना अटक केली आहे.
पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, एपीआय राजेश माळेगावे, पोलीस हवालदार अजय राणे, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, पोलीस अंमलदार सागर केकाण,तुषार भिवरकर, अमेय रसाळ, अमित जमदाडे, संदीप कोळगे, किशार भुजबळ, ओंकार कुंभार, इरफान पठाण आणि महिला पोलिस रेश्मा कंक यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : यंदाच्या गणेशोत्सवात पुण्यात महायुतीचे शक्तीप्रदर्शन; रणनीती तयार