Saturday, May 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Kedgaon News : धक्कादायक! लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत आईनेच केला पोटच्या मुलीचा निघृण खून; दौंडमध्ये खळबळ

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 7 September 2023, 14:28
Man murdered his wife and daughter in pune

संदीप टुले
Kedgaon News : केडगाव : आई आणि मुलीमध्ये झालेल्या तुफान हाणामारीत मुलीचा खून झाल्याची धक्कादायक घटना दौंड (जि. पुणे) येथील रेल्वे डिफेन्स कॉलनीत बुधवारी (ता. ६) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे दौंडसह पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

 

खुनाचा गुन्हा दाखल

दिक्षा हरिओम जागिंड (वय १८) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. तर सरिता हरिओम जागिंड असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मुलीचे वडील हरिओम श्यौप्रसाद जागिंड (वय ४४, व्यवसाय नोकरी, रा. डिफेन्स कॉलनी, रेल्वे कॉर्टर, दौंड, मूळ रा. गणपत विहार, तिजारा फाटक, अलवर, राजस्थान) यांनी फिर्याद दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिओम जागिंड हे दौंड रेल्वेमध्ये पॉइंट्स मॅन म्हणून नोकरी करतात. जागिंड हे पत्नी सरिता व मुली दिक्षा, विजयलक्ष्मी (वय १६), पायल (वय १४), अनु (वय ९) यांच्यासोबत रेल्वे डिफेन्स कॉलनीत राहतात. बुधवारी (ता. ६) मुलगी दिक्षा हिचा शाळेत वाद झाला होता. त्यामुळे दिक्षा घरी आल्यानंतर अबोला धरला होता. या रागातूनच दिक्षा सायंकाळी अचानक रागाने घराबाहेर निघाली. दिक्षा बाहेर जाताच आईने तिला दारातून आत ओढले आणि बेडवर बसविले. याचवेळी चिडलेल्या आईने दिक्षाच्या पोटावर जोरात लाथ मारली. प्रत्युत्तरानंतर दिक्षानेही आईला धक्का दिला.

दरम्यान, आई सरिताला राग अनावर झाला आणि तिने दिक्षाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या दोघींची भांडणे सोडविण्यासाठी लहान मुलगी विजयलक्ष्मी हिने मध्यस्ती केली असता तिलाही दोघींच्या भांडणात धक्का लागून ती खाली पडली. या भांडणात सरिताने दिक्षाच्या गळ्यावर लाथ मारून तिला बेडवर आडवे पाडले आणि दोन्ही हाताने गळा दाबला. त्यानंतर दिक्षा बेडवर निपचित पडली.

दरम्यान, ही संपूर्ण घटना मुलगी विजयलक्ष्मी हिने तिचे वडील हरिओम जागिंड हे कामावरून घरी आल्यानंतर सांगितली. त्यानंतर हरिओम यांनी दिक्षाजवळ जावून तिला आवाज दिला असता, ती हालचाल न करता, निपचित पडल्याचे दिसले. तिचे अंग थंड पडले होते. यातच तिचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले.

या घटनेनंतर हरिओम जागिंड यांनी थेट दौंड पोलीस स्टेशन गाठले आणि पत्नी सरिता हिच्या विरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दौंड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Manohar Bhosale News : भोंदू मनोहर भोसलेला थोडासा दिलासा; पोलीस कोठडी नाकारून न्यायालयीन कोठडीत रवानगी

Saturday, 2 May 2026, 19:12

Pune Crime News : नसरापूरनंतर चाकण हादरले; तीन वर्षीय चिमुरड्यावर अत्याचार करून हत्या, १६ वर्षीय आरोपी अटकेत

Saturday, 2 May 2026, 19:02

Pune Drug News : कोंढव्यात ‘ड्रग्ज माफिया’वर पोलिसांचा मोठा प्रहार; २२ किलो गांजासह महिला-युवक जेरबंद, साडेनऊ लाखांचा मुद्देमाल जप्त

Saturday, 2 May 2026, 18:27

MIT News : फॅशन केवळ डिझाईन नाही, तर तुमची ओळख – संतोष कटारिया

Saturday, 2 May 2026, 18:02

Speed ​​Bump : उरुळी कांचन पोलीस स्टेशनसमोरील गतिरोधक की मृत्यूचा सापळा? ; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाहनचालकांचा जीव धोक्यात ; उपाययोजना करण्याची ग्रामस्थांची मागणी..

Saturday, 2 May 2026, 17:53

Pune Solapur Road Trafice : नायगाव चौकातील कोंडीला दिलासा! नवीन डिव्हायडर बदलामुळे वाहतूक सुलभ होणार

Saturday, 2 May 2026, 17:29
Next Post

Pune News : मामाच्या जीवावर उठलेल्या भाच्याला दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा; नारायणगाव येथील प्रकार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.