Tuesday, October 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दिवाळीत खासगी बसचालकांना पुणे आरटीओचा दणका! जादा भाडे आकारल्यास थेट कारवाईचा इशारा; प्रवाशांना दिलासा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 27 October 2026, 15:46

पुणे : दिवाळी सणाच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन खासगी बसचालकांकडून जास्त भाडे वसूल केले जाण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर, शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक भाडे आकारल्यास संबंधित बस मालकांवर कडक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी दिला आहे. मोटर वाहन कायदा, 1988 आणि त्याअंतर्गत असलेल्या नियमांनुसार ही कारवाई करण्यात येईल.

प्रवाशांची आर्थिक लूट थांबवणे तसेच रस्ते सुरक्षिततेला प्राधान्य देणे या उद्देशाने नुकतीच प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले, परिविक्षाधीन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल फसले, रोहित आर्सुळ आणि बसमालक संघटनेचे 26 प्रतिनिधी सहभागी झाले होते.

20 एप्रिल 2018 रोजीच्या शासकीय निर्णयानुसार खासगी बसमालकांना निश्चित केलेल्या मर्यादेतच तिकीट दर ठेवणे अनिवार्य आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर यंदाच्या दिवाळीत विशेष पथकांमार्फत बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे.

सोबतच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी चालकांनी गाडी चालवताना मोबाईलचा वापर करू नये, दारू पिऊन वाहन चालवू नये आणि वेगाचे सर्व नियम पाळावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच वाहनाची सर्व आवश्यक कागदपत्रे आणि परवाने वैध असणे गरजेचे आहे.

जर कोणत्याही प्रवाशाकडून ठरवून दिलेल्या भाड्यापेक्षा जास्त पैसे वसूल केले गेले किंवा नियमांचा भंग झाल्याचे आढळले, तर त्यांनी घाबरून न जाता तक्रार नोंदवावी. प्रवाशांनी आपले नाव, मोबाईल क्रमांक आणि तिकिटाचा फोटो 8275330209 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवून आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दिवाळीत खासगी बसचालकांना पुणे आरटीओचा दणका! जादा भाडे आकारल्यास थेट कारवाईचा इशारा; प्रवाशांना दिलासा

Tuesday, 27 October 2026, 15:46

लाडकी बहीणनंतर आता ‘लाडकी विद्यार्थिनी’! दरमहा मिळणार पैसे; जाणून घ्या अधिक माहिती

Tuesday, 27 October 2026, 15:38

कोरेगाव भीमा चोरीप्रकरणी मोठी कारवाई! 10 गुन्ह्यांतील आरोपी पुण्यातून जेरबंद; शिक्रापूर पोलिसांना यश

Tuesday, 27 October 2026, 15:26

शेतकऱ्यांना दिवाळी गिफ्ट, पुण्यासाठीही मोठी घोषणा! मंत्रिमंडळाच्या बैठकीत 12 महत्त्वाचे निर्णय

Tuesday, 27 October 2026, 15:25

शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी जमा होणार ५ हजार रुपये, पण कधी अन् कोणाला मिळणार मदत? वाचा सविस्तर…

Tuesday, 27 October 2026, 15:18

अहिल्यानगरच्या ग्रामपंचायत कार्यालयात भरदिवसा महिलेचा मर्डर! १० वर्षांचं प्रेम, चारित्र्यावर संशय अन् बॉयफ्रेंडने केले चाकूने सपासप वार…

Tuesday, 27 October 2026, 15:15
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp