Uruli Kanchan News : उरुळी कांचन, (पुणे) : शिक्षक दिनाचे औचित्य साधत ईस्टर्न पुणे स्कूल ऑफ एक्सलन्सचे संस्थापक विकास कोतवाल यांनी जिल्हा परिषद शाळा हनुमानवाडीसाठी प्रोजेक्टर सेट, एलईडी मॉनिटर कीबोर्ड, तसेच सीपीयू असा संपूर्ण सेट शाळेस भेट दिला. अशी माहिती अष्टापुर केंद्राचे केंद्रप्रमुख राठोड यांनी दिली.
जिल्हा परिषद शाळेला संगणक संच भेट
यावेळी माजी केंद्रप्रमुख महेंद्र मोरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सूर्यकांत कोतवाल, रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामदास कोतवाल, पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष जगताप, सरपंच अश्विनी कोतवाल व उपसरपंच गणेश कोतवाल, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष योगेश कोतवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा पाटसकर यांनी केले तसेच शाळेच्या सहशिक्षिका उषा बोर्डे यांनी आभार मानले.