Pune News : पुणे : शहरात तस्करीचे प्रकार वाढत आहेत. पोलिसांनी मोठी कारवाई करत तस्करांकडून पाच कोटी रुपये किंमतीची व्हेल माशाची उलटी जप्त केली आहे. हिऱ्यांच्या दागिन्यांपेक्षा महाग समजल्या जाणार्या व्हेल माशाच्या उलटीची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या या आरोपीला डेक्कन पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. या वेळी त्याच्याकडून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाच कोटींची किंमत असलेली व्हेल माशाची उलटी जप्त करण्यात आली.
डेक्कन पोलिसांची कारवाई
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, विश्वनाथ रतन गायकवाड (वय ३८, रा. कात्रज खोपडेनगर, गुजरवाडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. (Pune News) नोव्हेंबर २०२२ मध्ये देखील डेक्कन पोलिसांनी पाच कोटींची व्हेल माशांची उलटी जप्त करताना पाच तस्करांना याप्रकरणी अटक केली होती.
फर्ग्युसन रस्त्यावरील गुडलक हॉटेलच्या मागे एक व्यक्ती व्हेल माशाच्या उलटीची विक्री करत असल्याची माहिती पोलीस नाईक सचिन गायकवाड यांना समजली. (Pune News) त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले यांनी याबाबतची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विपीन हसबनीस यांना दिली. या वेळी उपनिरीक्षक एस. भोसले व वनविभागाचे भांबुर्डा येथील वनरक्षक कृष्णा हाके पंचांसह संबंधित ठिकाणी आले.
दरम्यान, संशयित आरोपीकडे विचारणा केली असता, असमाधानकारक उत्तरे मिळाली. या वेळी सॅकची तपासणी केली असता, त्याच्या बॅगमधून व्हेल माशाची पाच कोटी रुपये किंमत असलेली उलटी सापडली.
पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सावंत, अमंलदार बोरसे, धनश्री सुपेकर, अमंलदार रोहित पाथरूट, महेश काळे, धनाजी माळी, दशरथ गभाले यांच्या पथकाने ही कारवाई केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुण्यातून मराठवाड्याकडे जाणाऱ्या तब्बल ६०० एसटी बसला ब्रेक; प्रवाशांचे प्रचंड हाल