राहुलकुमार अवचट
Yavat News : यवत : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर यवत येथे थांबलेल्या एसटी बसला पाठीमागून येणाऱ्या भरधाव कारने धडक दिल्याने अपघात झाला. यात कारमध्ये असलेले प्रवासी थोडक्यात बचावले.
कारमधील प्रवासी किरकोळ जखमी
लातुर-पुणे बस (एमएच २० बीएल ३९१२) ही बस सायंकाळी सातच्या सुमारास प्रवाशांसाठी पुणे बाजुकडे जाणाऱ्या महामार्गावर यवत येथे थांबली होती. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. कार एसटीच्या खाली घुसून अडकली. (Yavat News) यावेळी यवत येथील नागरिकांनी कारमध्ये अडकलेल्या दोन महिला, एक लहान मुलगा आणि चालकास बाहेर काढले. त्यांना किरकोळ दुखापती झाली असून, त्यांना तात्काळ औषध उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले.
या अपघातात कोणातीही जीवितहानी झाली नाही. अपघाताची माहिती मिळताच यवत पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक केशव वाबळे व बगाडे हे घटनास्थळी दाखल झाले व वाहतूक सुरळीत केली.
प्रवाशांना जीव मुठीत धरून महामार्गावर राहावे लागते उभे
यवत येथील एसटी थांबा हा ‘बेपत्ता’ झाल्याने एसटी बस पुणे-सोलापूर ही मुख्य महामार्गावर थांबत आहेत. चौफुला, वरवंड, पाटस, कुरकुंभ या ठिकाणी एसटी बस या सेवा मार्गावरून जातात. परंतु, यवत येथे मात्र एसटी बस मुख्य मार्गावरून जात आहेत.(Yavat News) यवत येथे महामार्गाच्या दोन्ही बाजूने लोखंडी बॅरिकेट लावण्यात आले असून, एसटीमध्ये जाण्यासाठी महिलांना लहान मुलांना व वयोवृद्धांना हे बॅरिकेट्स ओलांडून मुख्य मार्गावर जावे लागते. यावेळी अनेक लहान-मोठे अपघात वारंवार घडत आहे. एसटी थांबा परिसरात तीव्र उतार असल्याने वाहने वेगाने येत असतात. अशा परिस्थितीत एसटी बसने जाण्यासाठी प्रवाशांना जीव मुठीत धरून महामार्गावर उभे राहावे लागते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Yavat News : यवत स्टेशन येथे उड्डाणपूल बांधावा
Yavat News : पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त भुलेश्वरला भक्तीचा महापूर
Yavat News : यवत ग्रामीण रुग्णालयाची कौतुकास्पद कामगिरी; 36 तासांत 13 महिलांची यशस्वी प्रसूती