अजित जगताप
सातारा : महाराष्ट्राचे शिल्पकार व पाहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या कराड कर्मभूमीत राज्यातील नवनिर्वाचित राज्य सरकार मधील राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज कराड येथील शासकीय विश्राम गृहात झालेल्या बैठकीत एक दुय्यम अधिकाऱ्यांचा अवमान केला. या प्रकाराने उपस्थित सर्वजण अचंबित झाले.
शिवसेनेचे आक्रमक चेहरा अशी ओळख असलेले पाटणचे आमदार शमभुराज देसाई यांनी महाविकास आघाडी मध्ये असताना राज्यमंत्री पद भोगलेले आहे. त्या नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट मधून त्यांना मंत्री पदाची बढती मिळाली असून सध्या ते राज्य उत्पादन शुल्क खात्याची जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांच्या आक्रमक स्वभावच नेहमीच कौतुक होत आहे. मंत्री मंडळात मुख्यमंत्री/उपमुख्यमंत्री व अठरा मंत्री असताना विधी मंडळाच्या अधिवेशनात पायरीवर उभे राहून टीका व आरोप करणाऱ्या विरोधकांना ‘तुम्हाला खोकी पाहिजेत का’? असे प्रतिउत्तर देऊन सातरी बाणा मंत्री देसाई यांनी दाखवला होता. त्याचे सर्वत्र कौतुक करण्यात आले होते. त्यांच्यासारख्या स्वाभिमानी नेत्यांनी भर बैठकीत राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना बोलणे अनेकांना पटले नाही.
वीज पुरवठा खंडित होणे, कागद टेबलवर नसणे हा त्या अधिकाऱ्यांचा दोष नसला तरी त्यांना बोलावून एकांतात समज दिली असती तर ते योग्य ठरले असते. परंतु, प्रोटोकॉलच्या नावाने अधिकाऱ्यांना आरे तुरे करीत घरी जा. पी. ए. मला असा ढिलापणा चालणार नाही.मोठा अधिकारी नसता तर वाचला नसता असे बोल सुनावले. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीचा रंग उतरून गेला.
यावेळी प्रसार माध्यमातील प्रतिनिधी उपस्थित होते. मंत्री देसाई यांनी सातारा पोलिसांचे तोंड भरून कौतुक केले होते. त्यावेळी सातारा पोलिसांचे मनोध्येय वाढले होते.पण, आजच्या कराड येथील बैठकीत घडलेल्या प्रकाराने प्रोटोकॉल बाबत विधिमंडळ इमारतीत सिगारेट ओढणे किती योग्य? याची ही काहींनी आठवण करून दिली आहे. दरम्यान, अधिकारी वर्गाने ही मंत्री महोदयांच्या बाबत प्रोटोकॉल पाळणे गरजेचे आहे. सामान्य माणसाला जशी वागणूक दिली जाते. त्याचा अनुभव आल्याने आता राज्य उत्पादन शुल्क काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या वागणुकीत नक्कीच सुधारणा करतील. अशी चर्चा सुरू झाली आहे.