Pune News : पुणे : मुलीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून ‘त्या” क्षणांचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीकडून तब्बल ३० लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील मुंढवा परिसरातून उघडकीस आला आहे. मुंढवा पोलीस ठाण्यात दोन महिलासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन महिलासह चौघांवर मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
याप्रकरणी १९ वर्षाच्या तरुणीने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी आरोपी अरबाज हनीफ सिप्पी (वय-२४), हनीफ इस्माईल सिप्पी (वय-४०) यांच्यासह दोन महिलांविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार फेब्रुवारी २०१९ ते ऑगस्ट २०२३ यादरम्यान, ठाणे, लोणावळा येथे घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अरबाज याने तरुणीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यावेळी आरोपीने तरुणीचे अश्लील फोटो मोबाईलमध्ये काढले. (Pune News) याबाबत जर कोणाला काही सांगितले तर फोटो व्हायरल करण्याची धमकी आरोपींनी फिर्यादी तरुणीला दिली.
दरम्यान, आरोपीने अरबाज आणि इतर आरोपींनी शारीरिक संबंध ठेवतानाचे काढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार पैशांची मागणी केली. (Pune News) तसेच फिर्यादी यांच्या आई-वडिलांच्या खात्यावरील पैसे, एफडी सर्टिफिकेट मोडून आलेले पैसे, सोन्याचे दागिने गहाण ठेवून मिळालेले पैसे, पीडित तरुणीचे कॉलेज फीचे पैसे असे एकूण ३० लाख रुपये आरोपी अरबाज याने स्वत:च्या व वडिलांच्या खात्यावर ट्रान्सफर करून घेतले. अशी फिर्याद तरुणीने मुंढवा पोलीस ठाण्यात दिली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : खराडी येथे नोकरीचे आमिष दाखवून ९ जणांची २५ लाखांची फसवणूक
Pune News : चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीची हत्या ; आरोपी अटकेत, खराडी परिसरातील घटना.