Pune News : पुणे : सरकार नेत्यांच्या पेन्शनवर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. परंतु, राज्यातील अनेक कर्मचाऱ्यांची पेन्शन सरकारने बंद करून हा अन्याय त्यांच्यावर केला आहे, तरी आमदार, खासदार, राज्यपाल, राष्ट्रपती, पंतप्रधान व नगरसेवक यांचे पगार व पेन्शन बंद करा. अशी मागणी धायरी परिसरात फ्लेक्सच्या माध्यमातून आम आदमी पार्टीचे पुणे शहर प्रवक्ते धनंजय बेनकर यांनी केली आहे.
आम आदमी पार्टीचे पुणे शहर प्रवक्ते धनंजय बेनकर यांची मागणी
देशात लोकसभा आणि राज्यसभेचे एकूण ४,७९६ माजी खासदार पेन्शन घेत आहेत. त्यांच्या पेन्शनवर दरवर्षी ७० कोटी रुपये खर्च येत आहे. (Pune News ) याशिवाय यातील ३०० खासदारांचे निधन झाले असून, त्यांच्या नातेवाइकांना पेन्शन मिळत आहे. तर महाराष्ट्रात ८१२ माजी आमदारांवर महिन्याला ६ कोटी म्हणजे एक वर्षात ७२ कोटी रुपये खर्च होत आहेत.
दरम्यान, महाराष्ट्राबाहेरील राज्यात त्रिपुरा, मिझोराम, आसाम येथील माजी नेत्यांना अल्प पेन्शन आहे. यामध्ये ३० हजार ते ४० हजार पेन्शन आहे. परंतु महाराष्ट्रात ७० हजारांच्या पुढे पेन्शन आहे. तसेच इतर राज्यांच्या तुलनेत पगारही भरमसाट आहे. (Pune News ) त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर मोठ्या प्रमाणात भार पडत आहे. तरी या सर्व माजी नेत्यांवर होणारा खर्च बंद करून राज्याला प्रगतिपथावर नेण्यात यावे, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत बोलताना आम आदमी पार्टीचे पुणे शहर प्रवक्ते धनंजय बेनकर म्हणाले, दिल्ली आणि पंजाबसारख्या राज्यात माजी आमदार आणि खासदार यांची पेन्शन रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे तेथील सरकारचे कोट्यवधी रुपये वाचत आहेत. (Pune News ) या पैशाचा विनियोग मुलांच्या शिक्षणासाठी आणि मूलभूत सुविधांसाठी केला जात आहे. त्यामुळे तेथील राज्य प्रगती करीत आहेत. याच धर्तीवर राज्यातील माजी नेत्यांची पेन्शन बंद करावी.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : मुजोर मोटारचालकाची पीएमपी चालकाला बेदम मारहाण
Pune News : कन्स्ट्रक्शन कंपनीची तब्बल पावणे दोन कोटींची फसवणूक; चौघांवर गुन्हा दाखल