Film News : मुंबई : 1973 मध्ये रिलीज झालेला ‘बॉबी’ चित्रपट जेव्हा थिएटरमध्ये आला, तेव्हा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. चित्रपट निर्माते राज कपूर यांना या चित्रपटाच्या यशाचा खूप फायदा झाला. केवळ राज कपूरच नाही तर या चित्रपटाने डिंपल कपाडिया आणि ऋषी कपूर यांचेही नशीब बदलले. दोघांच्या फिल्मी करिअरला सुरुवात झाली. मात्र, स्वत: राज कपूर यांना त्यांच्या मुलाला म्हणजेच ऋषी कपूरला या चित्रपटात घ्यायचे नव्हते. ऋषी कपूरसाठी त्यांनी काहीतरी वेगळाच विचार केला होता. पण झालं वेगळच.
‘बॉबी’मध्ये राज कपूर यांना त्या काळातील इंडस्ट्रीतील सुपरस्टार असलेल्या राजेश खन्ना यांना या चित्रपटात घ्यायचे होते. पण त्यांचे बजेट जास्त असल्याने ते होऊ शकले नाही. राजेश खन्ना तेव्हा इंडस्ट्रीचे सुपरस्टार होते आणि त्यांची फीही खूप जास्त होती. अशा परिस्थितीत कोणताही मार्ग शिल्लक नसताना राज कपूर यांनी आपला मुलगा ऋषी याला चित्रपटात घेण्याचा निर्णय घेतला.
यासोबतच चित्रपटाच्या कथेतही बदल करण्यात आले आणि त्याचे रूपांतर किशोरवयीन प्रेमकथेत करण्यात आले. बॉबीने आपल्या कारकिर्दीला एक नवजीवन दिले. किशोरवयीन प्रेमकथेवर आधारित ‘बॉबी’च्या यशाने राज कपूर यांच्या कारकिर्दीला नवसंजीवनी तर दिलीच, पण ऋषी कपूर आणि डिंपल यांच्या करिअरलाही चांगली संधी मिळाली. त्यानंतर त्यांचे अनेक चित्रपट हिट होत गेले.