नवी दिल्ली : सरकारी नोकरी मिळावी यासाठी अनेकांचे प्रयत्न असतात. यामध्ये काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण आता नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांचा शोध आता संपणार आहे. कारण हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.
हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीत विविध विभागांमध्ये 300 हून अधिक रिक्त पदे भरली जाणार आहेत. ज्या पदांवर भरती होणार आहे, त्यात अभियंता, अधिकारी आणि सहाय्यक व्यवस्थापक या पदांचा उल्लेख करण्यात आला आहे. जे उमेदवार या पदासाठी इच्छुक आहेत ते hindustanpetroleum.com या वेबसाईटवर भेट देऊन अर्ज करू शकतात.
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे अभियंता, अधिकारी आणि सहाय्यक व्यवस्थापकाच्या एकूण 312 पदांची भरती करण्यात येणार आहे. यामध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, इन्स्ट्रुमेंटेशन आणि केमिकल ट्रेडमध्ये इंजिनीअर्सची भरती केली जाणार आहे. या पदांवर कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून भरती केली जाणार आहे.
कोण करू शकतो अर्ज?
ज्या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत, त्यामध्ये अभियंता पदांच्या भरतीसाठी संबंधित ट्रेडमध्ये 4 वर्षांची पदवी आवश्यक आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 25 वर्षांपर्यंत असावे.
शैक्षणिक पात्रता काय?
वेगवेगळ्या पदासाठी पात्रता आणि वयोमर्यादा
माहिती प्रणाली (IS) अधिकारी होण्यासाठी उमेदवारांना 4 वर्षांची B.Tech किंवा MCA पदवी असणे आवश्यक आहे. या पदांसाठी कमाल वयोमर्यादा ही 29 वर्ष आहे. कोणत्याही राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार सवलत दिली जाईल.
किती असेल पगार?
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने काढलेल्या या पदांवर 50,000 ते 2, 80,000 पर्यंत वेतन मिळू शकेल.
अर्ज शुल्क किती?
या सर्व पदांसाठी, अर्जाची फी फक्त अनारक्षित, इतर मागासवर्गीय (नॉन-क्रिमी लेयर) आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गातील उमेदवारांनी भरावी लागेल. फॉर्म भरण्यासाठी 1180 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अपंग उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.