अजित जगताप
सातारा: मराठी माणसांना प्रामाणिक व्यवसायातून स्वाभिमानाने उभे करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्षामध्ये सक्रिय सहभागी होण्यासाठी युवा पिढीने पुढाकार घेतला आहे . सातारा जिल्ह्यातील दुष्काळी माण- खटाव तालुक्यात राजसाहेब ठाकरे यांच्या विचारावर उभ्या असलेल्या मनसे मध्ये सक्रिय सहभागी होण्यासाठी दुष्काळी खटाव- माण तालुक्यात जोरदार प्रतिसाद लाभत आहे. या सभासद नोंदणी मध्ये किमान अडीच हजार नवोदित सभासद सामील होतील असा निर्धार मनसेचे जिल्हा संघटक सुरज लोहार यांनी व्यक्त केला आहे.
‘मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक’ अशी घोषवाक्य हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे, युवा ह्रदयसम्राट अमितसाहेब ठाकरे यांनी दिली आहे. त्यामुळे मराठी व हिंदुत्ववादी विचारांची माळ तयार झाली आहे. मनसे त आधुनिक पद्धतीने संगणकावरील वेबसाईटची लिंक व मिस्ड कॉल द्वारे प्राथमिक सदस्य नोंदणी होत आहे. दुष्काळी भागातील युवकांना मनसे कामकाजाची पद्धत तसेच मराठी व हिंदू धर्म रक्षणाच्या न्याय हक्कसाठी धावून जाण्याची प्रथा आवडली आहे.
मराठी तरुणांनी मराठी बाणा जपून कष्टाच्या पैश्यातूनच उदरनिर्वाह करावा.जात, धर्म,पंत विसरून लोकांच्या अडी अडचणीना धावून जावे. ही शिकवण दिली आहे. दि. २५ ऑगस्ट पासून संपूर्ण महाराष्ट्रात पंचवीस लाख मनसे नवीन सभासद महाराष्ट्रात होतील अशी चर्चा राजकीय विश्लेषक करत आहेत.
सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत असून खटाव- माण तालुक्यात युवा नेते सुरज लोहार यांच्या नेतृत्वाखाली देवापूर, पळसावडे, वाकी,झाशी,गोंदवले,म्हसवड,देवापूर,कुळकजाई,वारुगड,दहिवडी,पुसेगाव निढळ, बुध, ललगुण,डिस्कळ मोळ,पुसेसावळी, मायणी,शिंगणापूर, कातरखटाव,पुसेगाव,वर्धनगड,विसापूर, चौकीचा आंबा,औंध, चितळी,गोपूज,उंबर्डे ,शेणवडी, कलेढोण,पिंगळी,मार्डी,मोही,गोंदवले बु.या ठिकाणचे युवक स्वयंस्फूर्तीने सुरज लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेचे सभासद होण्यासाठी संपर्क साधत आहेत.
लोकांच्या अडीअडचणी साठी सदैव दिवस रात्र सामाजिक बांधिलकी जपत आहे. अनेकांचे मोबाईल वरील संपर्क हा कधीकधी मदत मागण्या साठी असतो. त्यांच्या शी संवाद साधणे हे कर्तव्य समजून ते काम करीत असल्याने युवा नेते सुरज लोहार यांनी केलेल्या सामाजिक कार्याची पोच पावती मिळत आहे.
मनसे पक्षात सदस्य अभियान म्हणजे सामाजिक कार्य करण्याची संधी आहे. वाम मार्गाने पैसे मिळवून राजकारण करणारांना हद्दपार करावयाचे असेल तर चांगल्या विचाराच्या युवकांनी मनसे मध्ये सहभागी होऊन राजकीय प्रतिष्ठा मिळवावी हाच त्या मागच्या हेतू आहे.
सामाजिक कार्यामुळे गोर गरिबांचे व थोरा मोठ्यांचे आशिर्वाद लाभलतात. स्वतः घणाचे घाव घालून ,ऊन वारा पावसाची तमा न बाळगता वाहनाचे पाटे बसवण्याचे कष्टाचे काम करत असतात. त्यांच्या हातावर पडलेले घटे हेच त्यांच्या निस्वार्थी व प्रामाणिकतेचे प्रतिक आहे. आज शेकडो तरुण त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन मनसे पक्षात सामील होत आहेत.
या त्यांच्या वाटचाली साठी मनसे जेष्ठ मार्गदर्शक माजी मंत्री आदरणीय बाळा नांदगावकर,शिरीष सावंत,दिलीप बापू धोत्रे
सचिन मोरे,आशिष साबळे- पाटील,गजानन काळे ,रिटाताई गुप्ता,प्रदीप वाघमारे ,पोपट जानकर,जगदीश खांडेकर, विशाल पोळ,युवराज पवार,तानाजी सावंत, दादा सूर्यवंशी, विशाल गोडसे, दत्ता शिंदे आदी मान्यवरांचे सहकार्य लाभले आहे. त्यामुळे भविष्यात घर तिथे मनसे सैनिक सामाजिक कार्य जोमाने करतील अशी आशा निर्माण झाली आहे.