राजेंद्रकुमार शेळके
Pimpri News : जुन्नर : भोसरी येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रणरागिणी सीमा जितेंद्र बेलापूरकर यांची मनसेच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली. मनसेचे नेते बाबू वागसकर यांच्या हस्ते बेलापूरकर यांना निवडीचे पत्र देण्यात आले. या वेळी गणेश सातपुते, किशोर शिंदे, रणजित शिरोळे, शहराध्यक्ष सचिन चिखले आदी मान्यवर उपस्थित होते.
विविध संघटनांनी केले अभिनंदन
या वेळी मराठी बांधव व भगिनींना अभिमान वाटेल असे काम करण्याची सूचना राज ठाकरे यांनी बेलापूरकर यांना दिल्या. (Pimpri News) बेलापूरकर यांच्या नियुक्तीबद्दल भोसरी तसेच पिंपरी-चिंचवड परिसरातील विविध संघटनांनी त्याचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : अजित पवारांच्या पिंपरी महापालिकेतील बैठकीला शिवसेना, भाजप पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती