Shirur News : शिरूर : डिंभा, माणिकडोह, चासकमान, पिंपळगाव जोगा, वडज या धरणांच्या निर्मितीमुळे दुष्काळात देखील या परिसरात पाण्याची कमतरता जाणवत नाही. या भागात हरितक्रांती करण्यासाठी सर्वांनी एकजूट दाखवून पाण्याचे योग्य व्यवस्थापन केले पाहिजे, असे मत सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी व्यक्त केले.
काठावर खुर्द (ता. शिरूर) येथे आयोजित दक्षिणमुखी हनुमान सप्ताहाला सहकार मंत्री वळसे पाटील यांनी भेट दिली. या वेळी ह. भ. प. आक्रुर महाराज साखरे यांचे काल्याचे किर्तन झाले. या कार्यक्रमासाठी शिरूर तालुक्याचे माजी आमदार पोपटराव गावडे, युवा नेते राजेंद्र गावडे, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, (Shirur News) उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, माजी सभापती प्रकाश पवार, घोडगंगाचे संचालक सोपानराव भाकरे, चांदाशेठ गावडे, प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच सीमा बिपिन थिटे, प्रथम लोकनियुक्त सरपंच बिपिन थिटे, उपसरपंच राजू दाते, उपसरपंच रंगनाथ होळकर उपस्थित होते.
विकासकामांचा पाठपुरावा योग्य पद्धतीने करा
दिलीप वळसे पाटील हे सहकारमंत्री झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी वळसे पाटील म्हणाले की, उर्वरित विकासकामांसाठी कोणत्याही प्रकारच्या निधीची कमतरता भासणार नाही.(Shirur News) विकासकामांचा पाठपुरावा योग्य पद्धतीने करा.
शिरूर तालुक्याचे माजी आमदार पोपटराव गावडे म्हणाले की, बेट भागामध्ये शेतीच्या प्रगतीबरोबरच तरुण वर्ग अध्यात्माकडे वळला आहे.(Shirur News) शिरूर तालुक्यातील तरूण वर्ग वेगवेगळ्या क्षेत्रांत नावलौकीक मिळवत आहे. स्पर्धा परिक्षांमधून पोलीस भरतीत अनेकांची भरती झाल्याचे पहावयास मिळत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : गाडीला कट मारल्याच्या कारणावरून ट्रक चालकाला मारहाण; सणसवाडीतील घटना