Railway News : पुणे : कर्जत, लोणावळा, भिगवण, रोहा, पनवेल, संगमेश्वर रोड, सातारा आणि मसूर या आठ स्थानकांवर मध्य रेल्वेने पुढील सहा महिन्यांसाठी प्रायोगिक तत्वावर काही एक्स्प्रेस गाड्यांना थांबे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्या स्थानकावरील प्रवाशांना फायदा होणार आहे.
सातारा रेल्वे स्थानकावर आता हुबळी दादर एक्स्प्रेसला तीन मिनिटे थांबा असणार आहे. तर, भिगवण स्थानकावर दादर पंढरपूर एक्स्प्रेसला दोन मिनिटे थांबा देण्यात आला आहे. कर्जत स्थानकावर डेक्कन एक्स्प्रेसला दोन मिनिटे थांबा असेल. तर नांदेड पनवेल एक्स्प्रेसला एक मिनिट थांबा राहणार आहे. Railway News
असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे…
लोणावळा स्थानकावर दादर पंढरपूर एक्स्प्रेस, दादर-साईनगर शिर्डी एक्सप्रेस, हुबळी दादर एक्स्प्रेस, कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस, विशाखापत्तनम-एलटीटी एक्स्प्रेस यांना थांबे देण्यात आले आहेत. तर, रोहा स्थानकावर तिरुवनंतपुरम-एलटीटी नेत्रावती एक्स्प्रेस, दिवा-सावंतवाड़ी एक्स्प्रेस यांना थांबे दिले आहेत. Railway News
दरम्यान, पनवेल स्थानकावर एलटीटी-एर्नाकुलम दुरंतो एक्स्प्रेस एक मिनिटे थांबा देण्यात आला आहे. या नवीन थांब्याचा निर्णयाची २५ ऑगस्टपासून अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा फायदा होणार आहे. जास्तीत जास्त प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.