यवत : यवत (ता. दौंड) येथे तृतीयपंथी (नानी) दीपा गुरु रंजिता नायक यांच्या निवासस्थानी श्री यल्लमा देवीचा श्रावणी पाणी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
पुणे जिल्ह्यातील तृतीयपंथी समाजाचे (मालक) वरिष्ठ गुरुवर्य रंजीता नायक यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूरचे शिवाजी आवळेकर, रवी नायक येरवडा शास्त्रीनगर, रावसाहेब दादा नायक- पुणे, रेखा नायक – पुणे, रमोला दिदी, सपना गुरु रंजीता नायक, रेणुका कुंकुवाले-पुणे, बाबा गुरु- सोलापूर, दिपक कदम न्हावरे , दिलीप आडसुळ-बिबवेवाडी, राजुभाऊ परदेशी- येरवडा आदी तृतीयपंथी समाजातील प्रमुख मान्यवर या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होते.
श्रावणी पाणी धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने यल्लमा देवीची आकर्षक सजावट करुन पारंपारिक वाद्याच्या गजरात यवत गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने दौंड तालुक्याच्या माजी आमदार रंजना कुल, युवा नेते तुषार थोरात यांनी यल्लमा देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला. तृतीयपंथी समाजाचे आराध्य दैवत यल्लमा देवीची आरती गावातून भव्य अशी मिरवणूक झाल्यानंतर माजी आमदार रंजना कुल यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी पुणे जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथी समाज मोठ्या प्रमाणात एकत्रित आले होते. यवतचे युवानेते गणेश शेळके सामाजिक कार्यकर्ते सुरज चोरगे, रोहिदास गायकवाड, काश्मीरा मेहता, आबासाहेब दोरगे, दादा माने, आण्णा दोरगे, त्रिंबक रायकर आदी युवा कार्यकर्ते उपस्थित होते.
यवत पंचक्रोशीतील सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांचा दीपा गुरु रंजीता नायक (नानी) यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. श्रावणी पाणी महोत्सवाच्या निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंचक्रोशीतील भाविकभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
रेणुकादेवी गायन पार्टीचे मास्टर अमोल सांगलीकर यांचे गायन नृत्य मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मास्टर बडे मिया छोटे मिया अमोल सांगलीकर यांनी देवीच्या उत्कृष्ट गीत गायनाने, नृत्य कलाकृतीने व अदाकारीने उपस्थित नागरिकांचे मने जिंकली.
यवत पंचक्रोशीतील नागरिकांनी रेणुका गायन पार्टीचे मास्टर अमोल सांगलीकर आणि नृत्य कलावंतांचे मनापासून कौतुक केले. यावेळी दिपा गुरु रंजिता नायक (नानी), पल्लवी गुरु दिपा, गौरी गुरु पल्लवी,वैशाली भोसले, आचल गुरु दिव्या, स्वीटी गुरु लोणी, रेणुका गुरु गौरी, ममता गुरु गौरी, राधा गुरु गौरी, परी गुरु आचल, वशिका, आकांक्षा, साहिल दादा, जुली ,सोनु यांना यवत गावातील सामाजिक कार्यकर्ते बंडू राजगुरू, अनिल गायकवाड, काश्मीरा मेहता, राजेंद्र जैन, नवनाथ आगलावे, आदी ग्रामस्थांनी सहकार्य केले यावेळी दौंड तालुक्यातील व यवत पंचक्रोशीतील यल्लमा देवीचे भाविकभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.