Pune News : पुणे : अवघ्या तीन हजार रुपयांत पतीने आपल्या पत्नीला चक्क मित्रांच्या हवाली केले होते. याप्रकरणी पतीच्या दोन मित्रांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी एका २५ वर्षांच्या विवाहित महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
डिसेंबर २०२० पासून सुरू होता प्रकार
पैशाच्या हव्यासापोटी पतीने आपल्या पत्नीला वाममार्गाला लावत जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले होते. डिसेंबर २०२० पासून हा संपूर्ण प्रकार सुरू होता. याबाबत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पतीला अटक केली होती. सध्या तो जामिनावर आहे.(Pune News) आता पोलिसांनी पतीच्या दोन मित्रांना अटक केली असून, आदित्य गौतम (रा. कसबा पेठ), सुजित पुजारी (रा. आंबेगाव) अशी या दोन मित्रांची नावे आहेत.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, पीडित महिलेच्या पतीने पैशाची गरज भागवण्यासाठी फिर्यादीला मारहाण करून उंड्री हांडेवाडी रस्त्यावर उभे करत वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले. एवढ्यावरच न थांबता, (Pune News) दोन मित्रांकडून प्रत्येकी तीन हजार रुपये घेत पत्नीला त्यांच्यासोबत शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडले. मित्रांनी तिच्यासोबत इच्छेविरुद्ध अनैसर्गिक शरीर संबंध ठेवले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी फिर्यादी महिला रास्ता पेठ परिसरातून जात असताना तिच्या पतीच्या मित्रांनी तिचा रस्ता अडवला. (Pune News) तिला जातीवाचक शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. या संपूर्ण प्रकारानंतर फिर्यादीने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही मित्रांना अटक केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : ग्राफोलॉजी व्यवसायात जास्त परताव्याच्या आमिषाने तब्बल १७ लाखांची फसवणूक