शिरूर, ता.२१ : जेष्ठ नेते शरद पवार यांनी या परीसराला भरभरून विकासाची कामे देऊन नंदनवन केले. या पुढील काळात देखील विकासासाठी सगळ्यांनी एकत्रीत माझ्या पाठिशी उभे रहा. या भागासाठी अजूनही शिल्लक कामे करायची असल्याने तरूणवर्ग आणी जेष्ठ मंडळींना विनंती करतो. विकास कामे करत असताना खूप जपून पाऊले टाकावी लागणार आहेत. असे राज्याचे सहकार मंत्री दिलिप वळसे पाटिल यांनी भावना व्यक्त केली.
मलठण ( ता. शिरूर ) येथे वनमहादेव,रोकडोबा व बिरोबा यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी माजी आमदार पोपटराव गावडे, भिमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष प्रदिप वळसे पाटील, आंबेगाव शिरूर विधाससभो मतदार संघाचे राष्ट्रवादी कॅाग्रेस चे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना वळसे पाटील म्हणाले की, राज्यात बेरोजगारीचा प्रश्न महत्वाचा आहे. त्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून नोकरी व व्यवसायासाठी तरूणांनी पुढाकार घ्यावा. असे धोरण आखत आहोत. त्याच प्रमाणे राज्यात कांद्याच्या भावा बाबत केंद्र सरकार कडून निर्यात कर रद्द करण्या बाबत धोरण ठरविले जाईल. असे ही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना माजी आमदार पोपटराव गावडे म्हणाले की, बैलगाडा शर्यत ही शेतकऱ्यांच्या मनोरंजना विषय आहे. या गावाने एवढ्या मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यत व बक्षीसांची खैरात केल्याने येथील कार्यकर्त्यांनी केलेले नियोजन महत्वाचे तसेच उल्लेखनिय आहे. या बैलगाडा शर्यती मध्ये जवळपास १३०० बैलगाडा मालकांनी भाग घेतला आहे.
यावेळी घोडगंगा कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र गावडे, माजी सभापती प्रकाश पवार, माजी सभापती विश्वास कोहकडे, माजी सरपंच विलास थोरात, नाना फुलसुंदर, दादा गावडे, नाथा कोळपे, सुखदेव कोळपे शिंदेवाडी व मलठण येथील ग्रामस्थ,बैलगाडा शौकीन उपस्थित होते.