संदीप टूले
Daund News : केडगाव : दौंड तालुक्यातील एकेरीवाडी गावातील उपसरपंच मंदा टकले यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी सोमवारी (ता. २१) मतदान घेण्यात आले. यामध्ये गंगाराम टुले यांची उपसरपंचपदी निवड झाली.
साडेचार वर्षांत प्रथमच उपसरपंच पदासाठी निवडणूक
एकेरीवाडी ग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या उपसरपंचपदासाठी ११ ऑगस्ट रोजी सर्व सदस्यांना अजेंडा काढण्यात आला होता. उपसरपंचपद आपल्या पारड्यात पडावे, यासाठी सर्व नेतेमंडळींच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. (Daund News) त्यातच १० दिवसांत बऱ्याच अनपेक्षित नाट्यमय घडामोडी घडल्या. गेल्या साडेचार वर्षांत प्रथमच उपसरपंच पदासाठी निवडणूक होत असल्यामुळे दोन्ही गटाचे कार्यकर्ते उत्सुक होते.
एका गटाकडून गंगाराम टूले व दुसऱ्या गटाकडून महेंद्र टूले यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. यावेळी दोन्ही गटाकडून हात वर करून मतदान घेण्याची विनंती करण्यात आली. त्यामुळे निवडणूक आधिकाऱ्यांनी दोन्ही गटांची विनंती अर्ज मान्य करून, हात वर करून मतदान घेण्यात आले. (Daund News) यामध्ये ग्रामपंचायत सदस्य सुनील भिसे काही कारणास्तव गैरहजर राहिल्याने एक मत कमी झाले. यामुळे १० पैकी ९ सदस्यांनी मतदान केले. यामध्ये गंगाराम टूले यांना ९पैकी ५ तर महेंद्र टूले यांना ४ मते मिळाली.
लोकनियुक्त सरपंच विद्याताई टुले यांनी गंगाराम टुले यांची उपसरपंचपदी निवड झाल्याची घोषणा केली. तसेच ग्रामसेवक नीलकंठ गायकवाड यांनी निवडणूक अधिकारी व पद्मिनी कौथळे यांनी सहायक म्हणून काम पाहिले. (Daund News) या वेळी ग्रामस्थांकडून विजयी सभेचे आयोजन करत, विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला.
आगामी काळात ग्रामपंचायतीमार्फत सर्व योजना सर्वसामान्यांपर्यंत कशा पोहचतील व गावाच्या विकासासाठी सरपंच व इतर ग्रामपंचायत सदस्यांना विचारात घेऊन गटतट न पाहता प्रामाणिक प्रयत्न करणार आहे, अशी प्रतिक्रीया नवनियुक्त उपसरपंच गंगाराम टूले यांनी व्यक्त केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : ज्येष्ठ साहित्यिक दिवंगत हरी नरके यांना पाटस येथे पुरोगामी संघटनांकडून श्रद्धांजली!
Daund News : भांडगावमध्ये भरदिवसा घरफोडी ; 4 लाख 65 हजारांचा ऐवज लंपास