Big Breaking : पुणे : पुण्यात अतिशय दुर्मिळ आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पार पडली आहे. एका ३० वर्षीय महिलेच्या पित्ताशयातून तब्बल एक हजाराहून अधिक खडे काढण्यात आले आहेत. हि दुर्मिळ शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे करण्यात आली. ही शस्त्रक्रिया लॅपरो ओबेसो सेंटर येथील लॅपरोस्कोपिक आणि बॅरिएट्रिक सर्जन डॉ. शशांक शहा यांनी केली आहे. .
मोठ्या प्रमाणात खडे निघण्याची घटना दुर्मिळ
मिळालेल्या माहितीनुसार, अंजली (नाव बदलले आहे) या महिलेला गरोदरपणात ओटीपोटात तीव्र वेदना जाणवू लागल्या. सोनोग्राफी केली असता सिस्टिक डक्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिच्या पित्त-मूत्राशयाच्या भागात मोठ्या प्रमाणात खडे जमा झालेले दिसून आले.दरम्यान, गर्भधारणा आणि येणाऱ्या प्रसूतीमुळे तिची पित्ताशय काढण्याची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. (Big Breaking) परंतु, प्रसूतीनंतर लॅपरोस्कोपिक कोलेसिस्टेक्टॉमी ही शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेची प्रक्रिया २० मिनिटांत पूर्ण झाली. यात १ ते २ मिमी हिरवट पिवळे खडे सापडले. शस्त्रक्रियेनंतर २० तासांच्या आत महिलेला घरी सोडण्यात आले आणि ती तिच्या बाळाला स्तनपानदेखील करू शकली.
डॉ. शशांक शहा म्हणाले कि, पित्त, क्षार हे यकृतामध्ये तयार होणारे पाचक घटक आहेत, जेव्हा ते शरीरातून बाहेर पडू शकत नाहीत तेव्हा ते कडक होतात आणि दगडांचे रूप धारण करतात. (Big Breaking) अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेत सर्वसाधारणपणे दहा-बारा खडे निघतात. परंतु, या महिलेला इतक्या मोठ्या प्रमाणात खडे निघण्याची ही दुर्मिळ घटना आहे. यासाठी वेळीच निदान व उपचार करणे महत्त्वाचे आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Big Breaking : घरगुती वादातून तडीपार गुंडाचा खून ; सय्यदनगर परिसरातील घटनेचा व्हिडीओ व्हायरल..
Big Breaking News : वानवडीत ज्वेलर्सच्या दुकानाला भीषण आग ; एक जवान गंभीर जखमी