Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Hadapsar News : फायनान्सची वाहने कमी किंमतीत देतो म्हणून हडपसर येथील तरुणाची १३ लाखाची फसवणूक ; चौघांवर गुन्हे दाखल, मोठे रॅकेट असण्याची शक्यता..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 19 August 2023, 10:48

Hadapsar News : हडपसर, (पुणे) : बँकेने जप्त केलेल्या दुचाकी व चारचाकी वाहने कमी किंमतीत घेऊन देतो असे सांगून हडपसर येथील तरुणाची १३ लाख ३९ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे शाखा युनिट- ६ ची कामगिरी..

प्रफुल्ल उबाळे, कमल उबाळे, अविनाश कदम, सुभाष रसाळ (रा. सर्वजण हडपसर, पुणे) असे फसवणूक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अनिरुद्ध राऊत (वय – २२ रा. भागीरथ नगर, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिरुद्ध राऊत हडपसर येथे शिक्षण घेत आहे. राऊत याला स्वतःच्या वापरासाठी एक दुचाकी लागत असल्याने त्याने याबाबत त्याचा मित्र दीपक आंधळे यास विचारणा केली. त्यावेळी आंधळे याने प्रफुल्ल उबाळे हा माझ्या ओळखीचा असून त्याचा गाड्या विकण्याचा व्यवसाय असल्याचे सांगून राऊत याची उबाळे याची भेट करून दिली. (Hadapsar News)

 

अनिरुद्ध राऊत ह उबाळे यांनी राऊतला मी श्रीराम फायनान्स व इतर फायनान्सचे काम करतो असे सांगितले. मी तुला या गाड्यांच्या विक्रीच्या व्यवसायात भरपूर पैसे कमवून देईल असे उबाळे याने राऊतला सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर उबाळे यांनी मुंढवा येथील एका फायनान्सच्या गोडाऊनमध्ये नेवून काही गाड्या दाखवल्या. गोडाऊनमध्ये असलेल्या गाड्या आयसीआयसीआय बँकेने जप्त केल्या असून फक्त माझ्या मार्फत विकल्या जातात व गाडी खरेदी केल्यानंतर एक महिन्यानंतर गाडीची कागदपत्रे मिळतात.

उबाळेच्या बोलण्यावर विश्वास पटल्याने राऊतने त्याला दुचाकीची मागणी केली. उबाळे याने ६५ हजार रुपये बाजारभाव असलेली एक दुचाकी ३२ हजार रुपयांना दिल्याने राऊतचा उबाळेवर अजूनच विश्वास निर्माण झाला. त्यानंतर उबाळे हा वेळोवेळी आलिशान गाड्यातून राऊत यास भेटू लागला आणि या गाड्यांच्या व्यवसायातून किती पैसे कमवतो हे सांगत होता. या सर्व गोष्टींवर विश्वास निर्माण झाल्याने राऊतने त्याच्याकडून आणखी एक चारचाकी व सहा दुचाकी इतकी वाहने घेतली. (Hadapsar News)

सर्व गाड्यांची पैसे ऑनलाईन स्वरूपात दिले. त्यानंतर उबाळे यांनी व्हॉट्सअॅपवर त्यांना काही गाड्यांच्या माहितीसह फोटो पाठवले. गाड्यांच्या किंमती बाजार किंमतीपेक्षा कमी असल्याने राऊतने उबाळे यांना कॅश व ऑनलाईन स्वरूपात १३ लाख ३९ हजार रुपये दिले. परंतु ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे उबाळेंनी गाड्या व गाड्यांची कागदपत्रे देण्यासाठी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली.

राऊत हा उबाळे कडे कागदपत्रे मागण्यासाठी जायचा त्यावेळी त्याला उबाळे याचा ड्रायव्हर अविनाश कदम याची भेट व्हायची. त्याच्या नादी लागू नको त्याचा पार्टनर सुभाष रसाळ आहे. तुझ्यासारखी किती पोर आली आणि गेली त्यांना काही फरक पडत नाही तसेच उबाळे यांची आई एका संघटनेची अध्यक्ष आहे अशा स्वरूपाच्या धमक्या देत होता. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच राऊत याने हडपसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

दरम्यान, राज्यातील अनेक युवकांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोळीचा कोणी वरदहस्त आहे का याबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत. प्रफुल्ल उबाळे याचेवर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल असून पुढील तपास गुन्हे शाखा युनिट-६ चे पोलीस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके करत आहेत. (Hadapsar News)

सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट सहाचे वरिष्ठ निरीक्षक रजनीश निर्मल, पोलीस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, पोलीस हवलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंडे, संभाजी सपटे, प्रतीक लायगुडे, रमेश मेमाणे, सचिन पवार, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, अश्फाक मुलानी, ज्योती काळे, नितीन धाडगे, सुहास तांबेकर यांनी केलेली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

तोबरेवस्तीत गाभण शेळ्या, बोकडांची चोरी; शेतकऱ्याचे 35 हजारांचे नुकसान

Saturday, 4 July 2026, 12:16

केडगावमध्ये दांपत्यावर जीवघेणा हल्ला; मारहाण करून मंगळसूत्र, दागिने आणि मोबाईल केला लंपास

Saturday, 4 July 2026, 12:09

पुणे–सोलापूर महामार्गावर राडा! पिकअप आडवी लावून एसटी चालकाला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:02

’13 लाखांचे कर्ज, 3.30 कोटींची खंडणी!’ बंदुकीचा धाक दाखवत कोऱ्या चेकांवर घेतल्या सह्या, फ्लॅट बळकावण्याचा प्रयत्न; खराडीत सावकारी रॅकेटवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 11:52

5.5 वर्षे पगारच दिला नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33
Next Post

Big Breaking : पुण्यात महिलेच्या पित्ताशयातून काढले तब्बल हजाराहून अधिक खडे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.