पुणे : बोगस विद्यापीठात प्रवेश घेतल्याने अनेकांचे नुकसान झाले आहेत. अशातच काही बनावट विद्यापीठांची यादी विद्यापीठ अनुदान आयोगाने जाहीर केली आहे. देशातील सर्वाधिक बनावट विद्यापीठ देशाची राजधानी दिल्ली आणि त्या पाठोपाठ उत्तर प्रदेशमध्ये आहेत. ही बनावट विद्यापीठ विद्यार्थ्यांना पदवी देऊ शकत नाहीत. या विद्यापीठातून शिक्षण पुर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिकृत पदवी मिळू शकत नाही.
या सगळ्या बोगस प्रकारातून विद्यार्थ्यांसह सर्वसामन्यांना माहिती देण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (Universities Grant Commission) बनावट विद्यापीठांची यादी जाहिर करण्यात आली आहे. तरी तुम्ही कुठल्याही विद्यापीठात प्रवेश घेण्याचा विचार करत असल्यास ही यादी जरुर पडताळून पाहा. या यादीत महाराष्ट्रातील एका विद्यापीठाचा समावेश आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाकडून जाहिर केलेल्या या यादीत दिल्लीत 8, उत्तर प्रदेशात 4, पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये प्रत्येकी 2 आणि कर्नाटक , केरळ , महाराष्ट्र , पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेशमध्ये प्रत्येकी एक बोगस विद्यापीठाचा समावेश आहे.
बनावट विद्यापीठांबाबत युजीसीने प्रसिद्ध केलेल्या नोटीसमध्ये विद्यार्थी आणि सामान्य जनतेला कळवण्यात आले आहे की, देशाच्या विविध भागांमध्ये 21 स्वयं-डिझाइन केलेल्या, मान्यता नसलेल्या संस्था कार्यरत आहेत, ज्या विद्यापीठ अनुदान आयोग कायदा 1956 चे उल्लंघन करत आहेत.
या यादीत महाराष्ट्रातील एका विद्यापीठाचा समावेश आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमधील राजा अरेबिक विद्यापीठाचा बनावट विद्यापीठाच्या यादीत समावेश आहे. नागपूरसह राज्यातील इतरही विद्यार्थ्यांनी या विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला असल्यास किंवा घेण्याच्या तयारीत असाल तर सावधान कारण हे विद्यापीठ तुम्हाला कुठल्याही प्रकारची पदवी देण्यास पात्र नाही. २१ बनावट विद्यापीठांची नावे युजीसीच्या वेबसाईटवर आहेत