युनूस तांबोळी
Shirur News : शिरुर : ‘रक्तदान करुया, मानवधर्म वाढवूया’ ही संकल्पना घेऊन रांजणगाव गणपती मंदिर येथे ‘हीलिंग लाईव्हस’ महाराष्ट्र टीम व रुबी हॉल क्लिनिक, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात तब्बल ६४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यानिमित्त आयोजित विविध उपक्रमांना संस्थेच्या सचिव रेशमी कुलकर्णी दुबईवरून आवर्जून उपस्थित होत्या.
६४ रक्तदात्यांनी केले रक्तदान
आमदाबाद येथील पांडुरंग आण्णा थोरात माध्यमिक विद्यालय, निमगाव भोगी येथील हनुमान माध्यमिक विद्यालयात शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच काही विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी संस्था मदत करणार आहे.
निमगाव भोगी येथे मागील तीन वर्षांपासून संस्था सातत्याने वृक्षारोपण करून त्या वृक्षांची निगा राखत आहे. वात्सल्यसिंधु फाऊंडेशननिर्मित उड्डाण प्रकल्पाद्वारे महिला समूहाच्या स्वयंनिर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री कार्यक्रमही या निमित्ताने भरविण्यात आला होता. (Shirur News) मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. आण्णापूर येथील जिल्हा परिषद शाळेत संगीत वादनाचे साहित्य भेट देण्यात आले.
कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्या व महागणपती देवस्थानच्या अध्यक्षा स्वातीताई पाचुंदकर, सचिव व हीलिंग लाईव्हस महाराष्ट्र टिमचे प्रोग्राम हेड डॉ तुषार पाचुंदकर-पाटील, राजमुद्रा पतसंस्थेचे अध्यक्ष दत्ताशेठ पाचुंदकर, सामाजिक कार्यकर्ते विवेकानंद फंड, हर्षददादा जाधव, माजी सरपंच संजय पावशे, सरपंच किरण झंजाड, मनोज अमृतकार, (Shirur News) नंदराज निंबोरे, उपसरपंच सुषमा बढे, उषाताई वाखारे, श्रीकांत कालेकर, साहेबराव शिवले, विनायक फंड, बलीराम नामदे, संदीप झंजाड इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र चीफ झोन संतोष सांबारे, सुनील पडवळ, संतोष शेवाळे, अविनाश सांबारे, संदीप सांबारे, स्वप्निल फलके, उज्ज्वला इचके, नीता लोखंडे, अमृता फलके, विवेकानंद बढे, पूजा सांबारे, पृथ्वीराज सांबारे व टीमने विशेष प्रयत्न केले.