संदीप टूले
Daund News : दौंड : नंदादेवी (ता. दौंड) येथील शेतकरी आणि ऊस वाहतूक करणाऱ्या ठेकेदाराला ऊस तोडीसाठी मजूर पुरवठा करतो, असे सांगून तब्बल ७ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एका मुकदमावर दौंड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. Daund News
७ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक
याप्रकरणी लालासाहेब मारुती आटोळे (नंदादेवी, ता. दौंड) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार
भरत गणपत जाधव (वय ३०, अंचाळे तांडा, ता.जि धुळे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलां आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लालासो आटोळे हे मागील आठ वर्षापासून परिसरातील साखर कारखान्यात ऊस वाहतूकीचे काम घेत आहेत. त्यांनी सन २०२१-२२ च्या गळीत हंगामामध्ये माळेगाव सहकारी साखर कारखान्यांमध्ये ऊस वाहतूकदारीचे काम घेतले होते. त्यासाठी त्यांनी ऊसतोड मजूर पुरवठा करणाऱ्या मुकदम भरत जाधव याच्याशी ऊसतोड मजूर पुरवठा करण्यासाठी १ जुलै २०२१ रोजी करार केला होता. Daund News
दरम्यान, बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना या ठिकाणी २४ मजूर, ८ बैलगाडी पुरविण्याचे ठरवले. त्यापोटी करारनामा झाल्यानंतर काही दिवसांनी रोख रक्कम २० हजार रूपये उचल म्हणून दिले. जोडीला पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक व सेंट्रल बँकेच्या खात्यातून ७ लाख ४० रूपये ऑनलाइन पाठविले होते. Daund News
त्यानंतर फिर्यादी आटोळे यांनी ऊसतोड मजूर पुरवठा करण्यासाठी जाधव यांना वारंवार फोन केला. मात्र जाधव याने फोन उचलला नाही. त्याच्या गावी जाऊन याबाबत चौकशी केली असता तो तिथून फरार झाला आहे. मुकदम भरत जाधव याने पैसे घेऊनही ऊसतोड मजूर पुरवठा केला नाही. त्यामुळे लालासाहेब आटोळे यांनी दौंड पोलीस ठाण्यात धाव घेतली.