तुषार सणस
Bhor News : भोर, (पुणे) : घराशेजारी अंगणात खेळत असलेल्या ५ वर्षीय चिमुकल्याचा सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भोर तालुक्यातील वीसगाव खोऱ्यातील खानापूर येथे हि घटना बुधवारी सायंकाळी घडली आहे.
रघुनाथ मारुती भालेराव (वय ५) असे सर्पदंशाने मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. बुधवारी या चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. Bhor News
कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला
याबाबत अधिक माहिती अशी की, सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. तर काही ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आहे. तसेच वातावरणात उकाडा देखील वाढला आहे. या उकाड्याने सरपटणारे प्राणी बाहेर येत आहेत. त्यामुळे मानवी परिसरातही त्यांचा वावर वाढला आहे. Bhor News
रघुनाथ हा आपल्या घराच्या शेजारी असणाऱ्या अंगणात बहिणीसोबत खेळत होता. यावेळी अचानक गवतात लपून बसलेल्या सापाने त्याला चावा घेतला. मात्र, रघुनाथ हा लहान असल्याने खेळण्या-खेळण्यात त्याला सर्पदंश झाल्याचे समजलेच नाही.
मध्यरात्री त्याला त्रास होऊ लागल्याने त्याला भोर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी रघुनाथ याला सर्पदंश झाल्याचे निष्पन्न झाले. त्याला कुटुंबीयांनी तात्काळ पुण्यातील रुग्णालयात उपचारासाठी आणले.
दरम्यान, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. रघुनाथ भालेराव या चिमुकल्याचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याने खानापूर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. Bhor News