युनूस तांबोळी
शिरुर : क्रांती दिनाचे औचित्य साधून जांबूत (ता. शिरूर) येथील जय मल्हार विद्यालयातील ७०० विद्यार्थ्यांना शिक्षक सुनील जाधव यांनी ‘पंचप्रण शपथ’ दिली. या वेळी विद्यार्थ्यांनी भारतास २०४७ पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करण्याचा निर्धार केला.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या सांगता सोहळ्याच्या निमित्ताने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या सुचनेनुसार जिल्ह्यात ९ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट या कालावधीत ‘मेरी माटी, मेरा देश’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याचाच भाग म्हणून वसुधा वंदन, स्वातंत्र्य सैनिक वीरांना वंदन, पंच प्रण शपथ, ध्वजारोहण, वृक्षांची लागवड या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी विद्यार्थ्यांना मातृभूमीच्या रक्षणासाठी वीरपुत्रांनी दिलेल्या बलिदानाची माहिती देण्यात आली. कार्यक्रमास डी. सी. एम. संस्थेचे सचिव विशाल शेवाळे, अध्यक्ष डी. टी. रजपूत, खजिनदार सिद्धार्थ शेवाळे, माजी मुख्याध्यापक शिवाजी धायगुडे, आर. एस. कापसे, मुख्याध्यापक एस. बी. फिरोदिया, पर्यवेक्षक झेड. पी. गाजरे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
या वेळी रमेश अर्जुन, मंगेश रत्नाकर, प्रशांत शितोळे, अर्जुन आढाव, शुभांगी माने, आशा गाजरे, सुजाता कापसे, जया गाजरे, साहेबराव हरभरे, वसूदेव जोरी, राजकुमार माळवे, लहू जोरी, कैलास शिंदे, जालिंदर राऊत, योगेश लंके, नितीन पडवळ, जालिंदर देवकाते आदी उपस्थित होते.