Uruli kanchan News : उरुळी कांचन, (पुणे) : पूर्व हवेलीत गेल्या काही दिवसांपासून डोळे येण्याची (कंजंक्टिव्हायटिस) साथ सुरू आहे. त्यामुळे डोळ्यांच्या औषधांची आणि ‘ड्रॉप’ची मागणी वाढली आहे. अचानक मागणी वाढल्याने शहरात सध्या विविध कंपन्यांच्या ‘आय ड्रॉप’चा तुटवडा जाणवत आहे. Uruli kanchan News
डोळे तपासणी शिबीर मोफत
नागरिकांना डोळे आल्याची लवकर निदान होऊन त्वरित उपचार मिळावा. यासाठी अजिंक्य चॅरिटेबल फाउंडेशन व सिद्धिविनायक हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने उरुळी कांचन (ता. हवेली) येथे डोळे तपासणी शिबीर सुरु आज बुधवार (ता.०९) पासून करण्यात आले आहे. अशी माहिती अजिंक्य चॅरिटेबल फाउंडेशनचे अजिंक्य कांचन यांनी दिली आहे.
पूर्व हवेलीत डोळ्यांची जोरात साथ सुरू आहे. ही साथ वेगाने पसरत असून घरोघरी डोळे आलेले रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे अजिंक्य चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अजिंक्य चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने औषधे, गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. या शिबिराला उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुप व ग्रामपंचायत उरुळी कांचन यांचे विशेष सहकार्य असल्याचे अजिंक्य कांचन यांनी यावेळी स्पष्ट केले. Uruli kanchan News