गणेश सुळ
kedgaon News : केडगाव, (पुणे) : हॉटेलच्या बाहेर लावलेली दुचाकी पळवून घेऊन गेलेल्या एका चोरट्याला पोलिसांनी २४ तासाच्या आत ताब्यात घेतले आहे. तर दोघजण पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.
दिपक किशोर चौधरी (वय -३२, रा. मंगरेवडी, कात्रज, पूणे) असे दुचाकी चोराचे नाव आहे. तर मोहन लक्ष्मण राठोड व दिपक लक्ष्मण राठोड (दोघेही रा. मंगरेवाडी, कात्रज पूणे) असे पळून गेलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी शशिकांत दादा मोरे यांनी केडगाव पोलीस चौकीत फिर्याद दिली होती.
गुन्हा दाखल करण्यात आला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केडगाव ग्रामपंचायत हद्दीत हॉटेल जयश्री नावाने एक हॉटेल आहे. रविवारी (ता. ०६) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास शशिकांत मोरे हे हॉटेलमध्ये पार्सल आणण्यासाठी आले होते. यावेळी हॉटेलच्या समोर दुचाकी लावली होती. यावेळी अचानकपणे समोर लावलेली दुचाकी तीन चोरट्यांनी चोरून नेली. (kedgaon News)
पार्सल घेवून आल्यानंतर त्याची गाडी हॉटेल समोर दिसली नाही. त्यांनी यांची कल्पना त्वरित त्याच्या मित्रांना कळवली व सर्वांनी मिळून या गाडीचे स्टेटस टाकून शोधाशोध सुरू केली. त्यानतंर दत्ता सोपांन हंडाळ यांना पारगाव येथील रहिवासी विशाल घिगे यांनी पारगाव परिसरात अनोळखी व्यक्ती ही गाडी घेऊन जात असल्याचे सांगितले. (kedgaon News)
गाडी मालक मोरे व हंडाळ यांनी याची माहिती केडगाव पोलिस स्टेशन यांना कळवली. दुचाकी चोरी झाल्यानंतर दुचाकी मालक व त्यांच्या सहकाऱ्यांनी दुचाकी चोरीचे स्टेटस आपल्या मोबाईल वर ठेवल्याने चोरांचा एक तासाच्या आत सुगावा लागला. स्वतः आणखी काही सहकाऱ्यांना सोबत घेऊन गाडीचा पाठलाग चालू केला. साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पारगाव येथील एका वस्तीमध्ये दीपक चौधरी याला गाडीसहित ताब्यात घेतले. (kedgaon News)
दरम्यान, यावेळी त्याचे दोन साथीदार पळून गेले. केडगाव पोलिस स्टेशन येथे या तिन्ही व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित प्रकरणात सहा फौजदार बाळासो गाडेकर, पोलीस नाईक पो. ना. विकास कापरे, भरत भोसले, दत्ता हंडाळ, निलेश हंडाळ, दिनेश हंडाळ यांचे सहकार्य लाभले.