Pune News : पुणे : शहरात १८ जुलै रोजी पुणे पोलिसांनी दोन दशतवाद्यांना अटक केली होती. मोहम्मद इमरान खान आणि मोहम्मद युनूस साकी या दोघांना पुण्यातील कोथरुड परिसरात गाड्यांची चोरी करत असल्याने पकडण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांना संशय वाढला आणि त्यांनी या दोघांच्या घरात झाडाझडती घेतली होती. त्यावेळी त्यांच्याकडील याच कारमध्ये एटीएसला २ पिस्टल आणि ५ जिवंत काडतुसं सापडली होती. त्यांची सखोल चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडे स्फोटकं, बॉम्ब बनवण्यासाठी लागणारं साहित्य आणि बॉम्ब बनवण्याची प्रक्रिया लिहिलेली चिठ्ठी सापडली होती. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास एटीएसकडे देण्यात आला. त्यानंतर या दोघांना मदत करणारा अब्दुल कादीर दस्तगीर पठाण आणि सिमाब नसरुद्दीन काझी यांनाही एटीएसने अटक केली. तसेच मुंबईच्या कारागृहात असलेल्या झुल्फीकार अली बडोदावाला यालाही अटक केली. आता याप्रकरणी मोठी बातमी समोर येत आहे.(Pune News)
१८ जुलै रोजी पुणे पोलिसांनी दोन दशतवाद्यांना अटक केली.
पुणे दहशतवादी प्रकरणाचा तपास आता एटीएसकडून राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) देण्यात आला आहे. या दहशवाद्यांचे इसिस आणि अल सुफा या दहशवादी संघटनांशी असलेल्या संबंधामुळे हा तपास एनआयएकडे दिला आहे. त्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया सुरु केली आहे. या प्रकरणात डॉ. अदनान अली बडोदेवाला याने दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवल्याचे तपासात समोर आले आहे. बडोदेवाला याला इसिसशी संबंधामुळे एनआयएने यापूर्वी अटक केली आहे. तो मुंबई येथील आर्थररोड कारागृहात आहे.(Pune News)
दरम्यान, पकडलेल्या दहशतवाद्यांनी पुणे, कोल्हापूर आणि सातारा येथील जंगलात जाऊन बॉम्बस्फोटाची चाचणी केल्याचे तपासात उघड झाले आहे. बडोदावाला याने दोन्ही दहशतवाद्यांच्या मदतीने इतरांना बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी शिबीर आयोजित केले होते. आरोपींकडून बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे, ज्यामध्ये केमिकल्स, केमिकल पावडर, लॅब इक्विपमेंट्स त्यामध्ये थर्मामीटर, पिपेट असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. महाराष्ट्र एटीएसने आतापर्यंत या प्रकरणात पाच आरोपींना अटक केली आहे.(Pune News)
दहशतवादी कारवायांसाठी राज्यातील तरुणांना आकर्षित करण्यासाठी गट सक्रीय असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोघे दहशवाद्यांकडील गॅझेटमधील माहितीनुसार त्यांचे इसिससी संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे. बॉम्ब बनवण्यासाठी अनेक साहित्य या दोघे दहशतवाद्यांनी आणले होते. ते जप्त करण्यात आले. त्यांनी रसायने अन् स्फोटके खरेदी केली होते. दोघे दहशतवादी जगभरात करण्यात येत असलेल्या दहशवादी घटनांचा अभ्यास करत होते. शहरातील संवेदनशील भागाची रेकी केली, ड्रोनने फोटो घेतले. दहशतवाद्यांकडे असलेल्या गाडीतून पिस्तुल आणि काडतुसे जप्त करण्यात आली. दोघे दहशतवादी दीड वर्षांपासून पुण्यातील कोंढवा भागात राहत होते.(Pune News)