Loni kalbhor : लोणी काळभोर, (पुणे) : कदमवाकवस्ती (ता.हवेली) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नासीरखान मनुलाखान पठाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. (Loni kalbhor)
मावळत्या उपसरपंच राजश्री काळभोर यांनी आपल्या पदाचा कार्यकाल संपल्यानंतर राजीनामा दिला होता. त्यामुळे उपसरपंच पद रिक्त झाले होते. रिक्त पदासाठी कदमवाकवस्ती (ता.हवेली) ग्रामपंचायतीच्या कार्यालयात शनिवारी (ता.५) निवडणूक प्रक्रिया पार पडली. हि निवडणूक प्रक्रिया सरपंच चित्तरंजन गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून व गुलाल उधळून जल्लोष
उपसरपंच पदासाठी नासीरखान पठाण व मंदाकिनी नामुगडे यांचे अर्ज आले होते. मात्र मंदाकिनी नामुगडे यांनी वेळेच्या आगोदर अर्ज माघारी घेतला. म्हणून उपसरपंच पदासाठी नासीरखान पठाण यांचा एकमेव अर्ज आल्याने सरपंच चित्तरंजन गायकवाड यांनी नासीरखान पठाण यांची उपसरपंचपदी निवड झाल्याची घोषणा केली. तर ग्रामविकास आधिकारी अमोल घोळवे यांनी या निवडणूकीचे शासकीय कामकाज पाहिले. (Loni kalbhor)
दरम्यान, नासीरखान पठाण यांची उपसरपंचपदी निवड होताच, कार्यकर्त्यांनी गुलाल व फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद साजरा केला. यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच नासेर पठाण यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच चित्तरंजन गायकवाड यांनी सत्कार केला. (Loni kalbhor)
यावेळी कदमवाकवस्तीच्या माजी सरपंच गौरी गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य आकाश काळभोर, सिमिता लोंढे, अविनाश बडदे, दीपक अढाळे, स्वप्नील कदम, योगेश मिसाळ, सलीमा पठाण, राणी गायकवाड, सोनाबाई शिंदे, कोमल काळभोर ,बिना काळभोर, सुनंदा काळभोर, रुपाली काळभोर, माजी ग्रामपंचायत सदस्य शरीफ खान, अद्योजक रमजान तांबोळी, इरफान शेख, समीर खान, फिरोज मेटकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Loni kalbhor)
यावेळी बोलताना नवनिर्वाचित उपसरपंच नासीरखान पठाण म्हणाले की, “कदमवाकवस्ती गावचे सरपंच चित्तरंजन गायकवाड यांनी माझ्यावर विश्वास ठेऊन मला उपसरपंचपदाची संधी दिली आहे. यामुळे आगामी काळात सरपंच व सर्व सहकारी ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून सर्वाना बरोबर घेऊन अत्यावश्यक असलेली सर्व कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे.”