Wagholi News : वाघोली : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य पदाधिकाऱ्यांची नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यामध्ये लोणीकर यांनी निष्ठावंत कार्यकर्ते गणेश (बापू) कुटे यांची भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड केली. कुटे यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.(Wagholi News)
महाराष्ट्र राज्य पदाधिकाऱ्यांची नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.
गणेश (बापू) कुटे यांची भाजपचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून ओळख आहे. 20 टक्के राजकारण तर 80 टक्के समाजकारण करून कुटे यांनी जनसामान्यांमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. हवेली तालुक्यातील आव्हाळवाडी या छोट्या गावात भाजपची शाखा स्थापन करून कुटे यांनी अध्यक्ष होण्याचा बहुमान मिळवला. गावातील सर्वसामान्यांची कामे करून केली. त्यानंतर तालुक्यातील गावांकडे लक्ष केंद्रित करून येथील विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले. भाजपला एक निष्ठावंत व सक्रीय कार्यकर्ता मिळाल्याने पक्षाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन हवेली तालुका सरचिटणीस, तालुका उपाध्यक्ष, युवा मोर्चा अध्यक्ष आदी विविध पदांवर काम करण्याची संधी दिली. विविध पदांची जबाबदारी चोख पेलत तालुक्यातील गावांमध्ये ‘कमळ’ फुलवण्यासाठी प्रयत्न केले.(Wagholi News)
पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता असल्याने पक्षाने सलग दोन वेळा हवेली तालुकाध्यक्ष पदावर काम करण्याची संधी दिली. भाजपची राज्यात सत्ता नसताना भाजपची ताकद वाढवण्यासाठी गावागावातील युवकांना संघटीत करून पक्ष संघटन मजबूत करण्याची मोलाची भूमिका कुटे यांनी बजावली. कुटे यांचे सामाजिक कार्य पाहता आव्हाळवाडी ग्रामस्थांनी बिनविरोध सदस्य ते उपसरपंच म्हणून त्यांना गावाचा विकास करण्याची संधी दिली.(Wagholi News)
एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या तरुणाने आपल्या कर्तृत्वाने पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून भाजप शाखा अध्यक्ष ते भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव पदापर्यंत मजल मारली. कुटे यांची भाजप पक्षाप्रती असलेली निष्ठा, सामाजिक कार्य व संघटन बघता त्यांची निमंत्रित सदस्य म्हणून निवड करण्यात आली. विविध पदावर जबादारी पार पाडत असताना नुकत्याच झालेल्या भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य पदाधिकाऱ्यांच्या निवडीमध्ये कुटे यांना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदाची जबादारी सोपवण्यात आली.(Wagholi News)
कुटे यांची राज्य उपाध्यक्षपदी वर्णी लागल्याबद्दल माजी राज्यमंत्री संजय भेगडे, आमदार राहुल कुल, भाजप नेते विक्रांत पाटील, राहुल लोणीकर, प्रदीप कंद, शरद बुट्टे पाटील, हवेली तालुकाध्यक्ष संदीप भोंडवे, भाजप नेते रोहिदास उंद्रे, सुदर्शन चौधरी, संदीप सातव, ग्रामपंचायत अविनाश कुटे, प्रदीप सातव पाटील, जयप्रकाश सातव पाटील, गणेश सातव, विजय जाचक आदींनी अभिनंदन केले आहे.
युवा संघटन मजबूत करण्यावर भर देणार : गणेश कुटे
भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपाध्यक्ष विक्रांत पाटील, युवा मोर्चा महाराष्ट्र अध्यक्ष राहुल लोणीकर, अनुप मोरे, सुदर्शन पाटसकर, कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विजय हरगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी उत्कृष्टपणे सांभाळणार असून, राज्यातील युवा संघटन मजबूत करण्यावर भर देणार आहे.(Wagholi News)
– गणेश (बापू) कुटे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य भाजप युवा मोर्चा