पुणे: ”माझी बायको”, आणि ”अगं मखना”, ही दोन गाणी नुकतीच रिलीज झाली आहेत. आणि या गाण्यांना चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे हि गाणी यावर्षीच्या गणेशोत्सवात नक्कीच दुमदुमणार आहेत.
राज्यातील सुप्रसिद्ध गीतकार हरिदास कड यांनी या गाण्यांची निर्मिती केली आहे. ‘अगं मखना”, या गाण्यावर राज्यातील रिल सुपरस्टार विक्रम दादा आल्हाट यांनी रील केले आहे. कड यांनी सुमारे पन्नास गाणी लिहिली असून त्यांची काही गाणी सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे, आदर्श शिंदे, मिलिंद शिंदे, वैशाली माडे, रितू पाठक, रेश्मा सोनवने, कविता राम, साधना सरगम, अपर्णा मयेकर, शकुंतला जाधव यांनी गायीली आहेत.
दरम्यान, सुप्रसिद्ध गायिका रेश्मा सोनवणे यांनी गायलेल्या “पप्पी दे पारुला” हे गाणे पाच कोटी वर
लोकांनी पाहिले आहे. पप्पी दे पारुला हे गाणं साता समुद्रा पार पोहोचले आहे. अमेरिकेत मराठी माणसांच्या मनात’ पप्पी दे पारुला ‘या गाण्याने अक्षरशः घर केल आहे. पप्पी दे पारुला या गाण्यावरील व्हिडिओ अल्बम मध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री स्मिता गोंदकर यांनी अतिशय सुंदर असा परफॉर्मन्स केला आहे.
सुप्रसिद्ध गीतकार हरिदास कड यांची “माझी बायको” आणि” अगं मखना” ही गाणी सध्या चर्चेत आहेत. माझी बायको ह्या व्हिडिओ अल्बम मध्ये सुप्रसिद्ध गीतकार हरिदास कड यांनी स्वतः अभिनय केला आहे. तर त्यांच्या जोडीला सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया विजया ही आहे. या व्हिडिओ अल्बम चे ही अनेकांनी कौतुक केले आहे. ही दोन्ही गीते संकल्प गोळे यांनी गायली आहे. या दोन्ही गाण्यांना संगीतही गोळे यांनी दिले आहे. ही दोन्ही गाणी सध्या सुमित म्युझिक इंडियाच्या यूट्यूब चैनल वर रिलीज करण्यात आली आहेत.